ठाणे - उड्डाण पुलाच्या उदघाटनाला मुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित असलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी विनय भंगाचा गुन्हा दाखल केला होता. या विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक पूर्व जामीनअर्ज मंगळवारी ठाणे सत्र न्यायालयात सादर करण्यात आला होता. ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी आ.आव्हाड याना १५ हजाराच्या जातमुचकल्याच्या जामिनाला मंजुरी दिली असल्याची माहिती वकील विशाल भानुशाली यांनी दिली.
जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अटकपूर्व जामीन मंजूर - उदघाटनात घडलेल्या प्रकारचा आसरा घेत मुंब्रा पोलीस ठाण्यात फिर्यादी रिधा रशीद या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यामुळे मुंब्रा, कळवा परिसरात रास्तारोको, आंदोलने, टायर जाळण्यासारखी आंदोलने झाली. या गुन्ह्यांमुळे एकाच राजकीय वातावरण तापलेले होते. तर आ. आव्हाड यांनी थेट राजीनामाच प्रदेशाध्यक्षांकडे सोपविला. अखेर या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंगळवारी ठाणे सत्र न्यायालयात मंजूर झाला. तर व्हिडियोने महत्वाची भूमिका बजावल्याचे प्रतिक्रिया आ. आव्हाड यांनी नोंदविली.
न्यायालयात झाला युक्तिवादा - विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी ठाणे सत्र न्यायालयात न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांच्या न्यायालयात आ. आव्हाड यांचे वकील विशाल भानुशाली यांनी अटकपूर्व जामीनअर्ज सादर केला. यावर सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला. त्यानंतर वकील विशाल भानुशाली यांनीही युक्तिवाद केला. त्यांनी उड्डाणपुलाच्या उदघाटनाच्या वेळी काढण्यात आलेल्या व्हिडीओ न्यायालयात सादर केला. या व्हिडिओत महिलेला बाजूला केल्याचा खुलासा झाला. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी दोन्ही वकिलांच्या युक्तीवादानंतर आ.आव्हाड याना १५ हजाराच्या जातमुचकल्याचा जामीन मंजूर केला.
जामीन मंजुरीचा आनंद नाही - मला या जामीन मिळाल्याचा आनंद अजिबात नाही. मी अटकपूर्व जामिनासाठी धडपड केली नाही. मात्र माझी पत्नी, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्याकडून जामीनासाठी अर्ज करा असे सांगण्यात आल्यानंतर मी या प्रकरणात जामीन घेतला. न्यायालयाने मला जामीन दिला. मात्र याचा मला आनंद झाला नाही, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला राजकारणाने गाठली खालची पातळी - माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा जिव्हारी लागला असून एखाद्या महिकेला पुढे करून राजकारण केले जात आहे. पोलिसांवर दबाव असल्याचे पोलीस सांगत आहेत. पोलीस आयुक्तपासून ते हवालदार पर्यंत फोनाफोनी सुरू आहे. त्यामुळें आता राजकरण एकदम खालच्या पातळीवर गेले असल्याचा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला.
आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा : राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Molestation Case On Jitendra Awhad). मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 नुसार त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंब्रा येथील कळवा, ठाणे शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
हर हर महादेव प्रकरण - आव्हाड यांच्यावर 'हर हर महादेव' चित्रपट प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह बाबी चित्रपटात आढळल्याचा दावा करीत त्याआधारे या चित्रपटाला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह ऐतिहासिक बाबी काढून टाकाव्या यासाठी त्यांनी ठाणे शहरातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहातील एक शो देखील बंद पाडला होता. त्या संदर्भात त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला गेला आहे.