महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आयुक्त साहेब पक्षपात करून नका..गाठ आमच्याशी'! जितेंद्र आव्हाड आक्रमक - jitendra avhad on illegal construction in thane

मीरा-भाईंदर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांनाच दम भरला.

jitendra avhad in thane
'आयुक्त साहेब पक्षपात करून नका..गाठ आमच्याशी'! जितेंद्र आव्हाड आक्रमक

By

Published : Oct 31, 2020, 2:22 AM IST

ठाणे : मीरा-भाईंदर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांनाच दम भरला.

'आयुक्त साहेब पक्षपात करून नका..गाठ आमच्याशी'! जितेंद्र आव्हाड आक्रमक

आयुक्त डॉ.विजय राठोड यांच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत त्यांनी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात पक्षपाताचा आरोप केला. आमच्या एका कार्यकर्त्याच्या हॉटेलवर कारवाई केली, मग इतर हॉटेल वर का नाही, अशा प्रश्न विचारत 'हिंमत असेल तर माजी आमदाराच्या हॉटेलवर कारवाई करा', असे आव्हान पालिका आयुक्तांना केले.

ज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांनाच दम भरला.

मीरा भाईंदर शहरात 124 अनधिकृत लॉजिंग बोर्डिंग आहेत. आयुक्तांमध्ये हिंमत असेल तर त्यातले फक्त 24 हॉटेल पाडून दाखवावे, असे आव्हान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. राठोड साहेब कोणाला तरी खूश करण्यासाठी काम करत असतील, तर गाठ आमच्याशी! असा सज्जड दम त्यांनी भरला आहे.

आदिवासी जमिनीवर माजी आमदारांचे अनधिकृत बांधकाम आहे. त्याच्यावर कारवाई करायला हिंमत होत नाही का, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details