ठाणे - देशात लोकशाही टिकवायची असेल, तर मतदान करणे गरजेचे आहे. यंदा मतदारांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता परिवर्तन नक्कीच घडेल असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. लोक हुकूमशाही विरुद्ध मतदान करताना दिसत असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.
मतदारांचा प्रतिसाद पाहता परिवर्तन नक्कीच घडेल - जितेंद्र आव्हाड - jitendra aavhad
यंदा मतदारांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता परिवर्तन नक्कीच घडेल असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. लोक हुकूमशाही विरुद्ध मतदान करताना दिसत असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. २०१४ मध्ये मोदी लाट ही स्वप्नांमुळे आली होताी. त्या स्वप्नांचा चुराडा होताना लोकांनी पाहिले असल्याचे आव्हाड म्हणाले. दर निवडणुकीत मतदान याद्यांमध्ये होणार घोळ पाहता आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर चांगलेच ताशेरे ओढले.