महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दागिने चोरणारा पोलिसांच्या ताब्यात, शिताफीने केला शोध

चोरी झालेला माल परत मिळवण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत करावी लागते. नालासोपारा येथे झालेल्या सुमारे पावणेसहा लाख किंमतीच्या दागिन्यांची चोरी पोलिसांनी शिताफीने पकडली आहे.

jewelry-thief-in-police-custody
दागिने चोरणारा पोलिसांच्या ताब्यात

By

Published : Aug 29, 2020, 6:05 PM IST

पालघर/नालासोपारा: तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने चोरी करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

नालासोपारा पूर्वेकडील संख्येश्वर नगर येथे २२ ऑगस्टला वनिता अपार्टमेंट ए/२, येथे राहणाऱ्या वंदना रखमाजी सकपाळ (वय ६७) यांच्या राहत्या घरात चोरीची घटना झाली होती. त्यांच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून गादीच्या खाली ठेवलेली कपाटाची चावी घेऊन बेंडरुममधील कपाट उघडून कपाटात ठेवलेले ५,७६,७२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले होते. या चोरीच्या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागिय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, यांनी सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून, अटक करण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक फौजदार शिवानंद सतनासे, पोलीस हवालदार युवराज जावळे, पोलीस नाईक आनंद मोरे, संदीप शेरमाळे, शेखर पवार, प्रशांत सावदेकर,पोलीस कॉन्स्टेबल सुखराम गडाख, योगेश नागरेयांनी तपास करून आरोपी ऋषीकेश अरविंद सकपाळ २३ ( शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुबंई) याला अटक केली व त्याच्या कडून चोरी केलेले एकूण १६५ ग्रॅम वजनाचे एकुण ५,७६,७२० रु किंमतीचे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा फिर्यादी वंदना यांचा चुलत नातू असून वंदना या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल होत्या, म्हणून तो त्यांना बघण्याच्या बहाण्याने तो नालासोपारा येथे आला होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने घरात प्रवेश करून चोरी करून पळ काढला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details