ठाणे - एका ज्वेलर्सच्या दुकानात तीन दरोडेखोरांनी दिवसाढवळा घुसून दुकानातील मालकासह कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दागिने घेऊन चोरटे पसार झाले. ही खळबळजनक घटना कल्याण नजीक असलेल्या टिटवाळा परिसरात घडली. विशेष म्हणजे ज्वेलर्सच्या दुकानात घडलेला दरोड्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी या दरोड्यातील एकाला उल्हासनगरमधून अटक केली आहे. सनी राजूवालिया (वय २५) असे त्याचे नाव असून त्याचे दोन साथीदार अद्यापही फरार आहे.
बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्स दुकानावर दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद - ज्वेलर्स दुकानावर दरोडा
टिटवाळ्याच्या इंदिरानगरमधील यमुना ज्वेलर्समध्ये तीन तरुण दागिने खरेदी करण्याचा बहाण्याने दुकानात आले होते. दागिने पाहण्याचा बहाणा करत त्यांनी काही वेळातच आपल्याजवळील बंदुकीने मालकासह कर्मचाऱ्यांना धाक दाखवून सुमारे दोन लाखांचे दागिने घेऊन तेथून पसार झाले. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
टिटवाळ्याच्या इंदिरानगरमधील यमुना ज्वेलर्समध्ये तीन तरुण दागिने खरेदी करण्याचा बहाण्याने दुकानात आले होते. दागिने पाहण्याचा बहाणा करत त्यांनी काही वेळातच आपल्याजवळील बंदुकीने मालकासह कर्मचाऱ्यांना धाक दाखवून सुमारे दोन लाखांचे दागिने घेऊन तेथून पसार झाले. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आज (रविवारी) कल्याण तालुका पोलिसांना फरार दोन्ही आरोपीचे नावे व ठिकाणाची माहिती मिळाली असून लवकरच फरार दरोडेखोर अटक करण्यात पोलिसांना यश येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी दिली आहे.
हेही वाचा -अजित पवार आमचेही ऐकत जा, अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत - संजय राऊत