ठाणे -डोंबिवली पश्चिमेकडील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील मोठागाव रेल्वे फाटकात मोठा अपघात होता होता टळला आहे. एक स्कार्पियो जीप चालक भरधाव जीप चालवून रेल्वे फाटक तोडून रुळावर गेला. त्याच सुमाराला या मार्गावरून भरधाव येणाऱ्या एक्सप्रेसची धडक बसून स्कॉर्पियो रेल्वेच्या गेटमन केबिनमधे जाऊन आदळली, या अपघातात जीप चालक गंभीर जखमी झाला आहे. प्रदीप बांगर असे चालकाचे नाव आहे.
रेल्वे फाटक तोडून जीप एक्सप्रेसवर आदळून चालक गंभीर जखमी - डोंबिवली
दिवा-वसई रेल्वे मार्गावरील मोठागाव रेल्वे फाटकावर हा अपघात घडला. भरधाव स्कॉर्पियोच्या चालकाने रेल्वेचे फाटक तोडून जीप रुळावर घुसवल्याने समोरुन येणाऱ्या एक्सप्रेसची धडक बसून स्कॉर्पियो रेल्वेच्या गेटमन केबिनमधे जाऊन आदळली.

दिवा-वसई रेल्वे मार्गावरील मोठागाव रेल्वे फाटकातून भागवत की कोठी-पुणे एक्सप्रेस मध्यरात्री दीड वाजेच्या सुमाराला जात होती. त्याच सुमाराला भरधाव स्कॉर्पियोच्या चालकाने रेल्वेचे फाटक तोडून जीप रुळावर घुसवली. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या एक्सप्रेसची धडक बसून स्कॉर्पियो रेल्वेच्या गेटमन केबिनमधे जाऊन आदळली. सुदैवाने एक्क्प्रेसचा मोठा अपघात टळला. मात्र, या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघात स्कार्पियो जीपचा चुराडा झाला असून या अपघातात जीप चालक प्रदीप गंभीर जखमी झाला आहे.भरधाव जीप चालवून रेल्वेचे फाटक तोडुन रेल्वेच्या मालमत्ताचे नुकसान केल्या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.