महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विजय मल्ल्याला जागा दाखवून देणारे जगन्नाथराव हे पहिले व्यक्ती - देवेंद्र फडवणीस - minister

सोमवारी सायंकाळी डोंबिवली येथे भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलत होते.

देवेंद्र फडवणीस

By

Published : Jul 30, 2019, 10:20 AM IST

ठाणे- उत्पादन शुल्कमंत्री असताना त्या काळात मद्यसम्राटांचा दबाव असतानाही जगन्नाथ पाटील यांनी राज्य सरकारचा महसूल वाढवण्यासाठी कठोर निर्णय घेतला होता. यामुळे खऱ्या अर्थाने विजय मल्ल्याला त्याची जागा दाखवून देणारी पहिली व्यक्ती कोण असेल तर ते जगन्नाथ पाटील आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले. सोमवारी सायंकाळच्या सुमारास डोंबिवली येथे भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा सत्कार

या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार संजय केळकर, किसन कथोरे, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, बालाजी किणीकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

जगन्नाथ पाटील राजकारणात येण्यापूर्वी जादूगार होते. मात्र, राजकारणात आल्यानंतर त्यांनी जादूचे प्रयोग सोडून राजकीय जादुगाराची भूमिका पार पाडली. पाटील यांनी आपली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडली आहे. नगरसेवक ते मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रश्न सोडवण्याची त्यांनी नेहमीच सातत्याने प्रयत्न केले आहे. त्यांच्या मुलीने लिहिलेले 'कळसाचा पाया' पुस्तक म्हणजे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे फडणवीस म्हणाले.

संपूर्ण कारकिर्दीत पाटील यांनी पारदर्शक काम केले. विशेष म्हणजे उत्पादन शुल्क मंत्री असताना त्यांनी एम. आर. पी. प्रणाली आणली. चांगले वकृत्व असल्यामुळे ते सभाग्रहात प्रत्येक विषयावर बोलायचे. त्यातून आम्हालाही शिकायला मिळाले. त्यांच्या कुटुंबाने त्यांना साथ दिल्यामुळे ते आजपर्यंत प्रवास करू शकले, असे फडणवीस यांनी कार्यक्रमात बोलताना म्हटले. कार्यक्रमाला ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details