महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात 'लालपरी'मध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ; व्हिडिओ व्हायरल - Thane irresponible incharge front of people

कल्याण-मुरबाड एसटी प्रवासादरम्यान असल्याचे समोर आले असून सध्या हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर भलताच व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सीएसटी प्रवाशांना घेऊन जात असताना या एसटीच्या फुटबोर्डच्या मधला पत्रा गायब असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या एसटी बसमध्ये अंधारात एखाद्या प्रवाशाला हे दिसले नाही तर त्याचा जीव देखील जाऊ शकतो. अशाप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या एसटी महामंडळाचा बेजबाबदारपणा एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

ठाण्यात 'लालपरी'मध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ; व्हिडिओ व्हायरल

By

Published : Nov 7, 2019, 5:26 PM IST

ठाणे - ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासाचे साधन 'लालपरी' अर्थात एस.टी. बस असते. मात्र, प्रवासाचे साधन ठरलेल्या या एसटी बसमध्येच प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ मांडला की, काय असे दिसून आले. यासंदर्भात समाज माध्यमांवर धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ठाण्यात 'लालपरी'मध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ; व्हिडिओ व्हायरल

कल्याण-मुरबाड एसटी प्रवासादरम्यान असल्याचे समोर आले असून सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमांवर भलताच व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सीएसटी प्रवाशांना घेऊन जात असताना या एसटीच्या फुटबोर्डच्या मधला पत्रा गायब असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या एसटी बसमध्ये अंधारात एखाद्या प्रवाशाला हे दिसले नाही तर त्याचा जीव देखील जाऊ शकतो. अशाप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या एसटी महामंडळाचा बेजबाबदारपणा एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

हेही वाचा -आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एसटी बसेसची नियमितपणे तपासणी सुरू आहे की नाही ? तसेच तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का ? असा प्रश्न सध्या प्रवाशांकडून विचारला जात आहे. तर दुसरीकडे तपासणी न करताच अशा एस. टी. बसमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या वाहक आणि चालकावर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे

हेही वाचा -वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे अखेर 'त्या' वाघाचा मृत्यू; वन्यजीव प्रेमींमधून संताप

ABOUT THE AUTHOR

...view details