चतुरस्त्र मुलाखतकार अशोक शेवडे यांचे निधन
पाच हजाराहूनही जास्त मुलाखती घेणारे मुलाखतकार अशोक शेवडे यांचे गुरूवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. लवकरच ते 'आम्ही आठवणी चंदेरी सोनेरी' या कार्यक्रमाचा ४०० वा भागाचे सादरीकरण करणार होते.
संबंधित विषयाचा सखोल अभ्यास, विषयाची समज आणि प्रश्न विचारण्याची हातोटी ही शेवडे यांच्या मुलाखतीची खास वैशिष्टये होती. स्टेट बँकेतील चांगल्या पदावरील नोकरी सोडून ते पूर्णपणे मुलाखत क्षेत्रात आले. रेडिओ आणि दूरदर्शनवर ते मान्यवरांच्या मुलाखती घेत असत. त्यांनी चार दशकांच्या कारकीर्दीत पाच हजारांहून जास्त मुलाखती घेतल्या. त्यांनी कार्यक्रमाद्वारे समाजोपयोगी काम करणाऱ्या संस्थांना प्रकाशझोतात आणले. लवकरच ते 'आम्ही आठवणी चंदेरी सोनेरी' या कार्यक्रमाचा ४००वा भागाचे सादरीकरण करणार होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.