ठाणे- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाण्यातील पोलिसांनीही मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फनसळकरसह इतर पोलीस अधिकारी वर्गाने ठाण्याच्या सिद्धी हॉलमध्ये योगा केला.
ठाण्यात पोलिसांनीही साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाण्यातील पोलिसांनी ठाण्याच्या सिद्धी हॉलमध्ये योगा केला.
ठाण्यात पोलिसांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन
पोलिसामध्ये नेहमी वाढता ताणतणाव असतो. अनियमित काम आणि तणाव यामधून अनेक पोलीस आजारी असतात. तसेच यामुळे मानसिक तणावही मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी योगा हा एक चांगला पर्याय असल्याचे मत यावेळी पोलीस आयुक्त विवेक फनसळकर यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी योगा आणि त्याचे फायद्यांबाबतही या कार्यक्रमात माहिती देण्यात आली.