महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कचरा वेचणाऱ्या मुलांकडून पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार; झाडं दत्तक घेत संगोपनाचा निर्धार

आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचून उपजीविका चालवणारी मुले आता पर्यावरणाच्या रक्षणासाठीही पुढे सरसावली आहेत.

kalyan
कचरा वेचणाऱ्या मुलांकडून पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार

By

Published : Jun 30, 2021, 5:57 PM IST

Updated : Jun 30, 2021, 6:35 PM IST

ठाणे - कल्याण पश्चिम परिसरात खाडीलगत असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचून उपजीविका चालवणारी मुले आता पर्यावरणाच्या रक्षणासाठीही पुढे सरसावली आहेत. विशेष म्हणजे ही कचरावेचक मुलं केवळ झाडं लावून थांबली नाहीत, तर ते ही झाडं दत्तक घेत त्यांच्या सुयोग्य संगोपनाचीही काळजी घेणार आहेत. यामुळे कल्याणमधील आदिवासी वस्ती असलेल्या पाणबुडेनगरमध्ये येत्या काळात काहीसे पर्यावरणपूरक वातावरण पाहायला मिळणार आहे.

कचरा वेचणाऱ्या मुलांकडून पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार

हेही वाचा -महाविकास आघाडी नेत्यांची उद्या बैठक; विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत होणार चर्चा

  • काहींचा केवळ सेल्फी घेण्यापुरताचा झाडे लावा उपक्रम -

नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अनेकांनी वृक्षारोपण केले खरे. मात्र, त्यापैकी काही रोपट्यांची आताची परिस्थिती काय आहे? हा कदाचित संशोधनाचा विषय ठरू शकेल. विशेष म्हणजे झाडे लावणाऱ्या काही जणांसाठी हा तेवढ्या एका दिवसापुरता किंवा केवळ सेल्फी घेण्यापुरताच उपक्रम असावा, असे दिसून आले. मात्र, कल्याण शहरातील पाणबुडेनगर येथील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या मुलांनी मात्र कोणताही दिखावा न करता अगदी मनापासून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात आधारवाडी डम्पिंगवर शहरातील कचरा टाकण्यास महापालिका प्रशासनाने बंद करून या डम्पिंगवर उद्यान उभारण्याचा संकल्प प्रशासनांच्यावतीने जाहीर करण्यात आला. त्यामुळे कचरावेचक मुलांकडून पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात झाल्याने त्यांचे कौतुकही होत आहे.

  • विविध प्रकारच्या झाडांची लागवड -

कल्याणमधील अनुबंध संस्थेच्या माध्यमातून पाणबुडे नगर आदिवासी वस्तीतील मुलांनी आवळा, चिंच, जाम, पेरू, कडुलिंब, लिंबू, सिताफळ आदी प्रकारची झाडं लावली. केवळ झाडं लावून ही मुलं थांबली नाहीत तर ती जगण्यासाठी या झाडांचे पालकत्वही या मुलांनी घेतले आहे. ही जबाबदारी ही मुलं अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडत असून, गेल्या 3 आठवड्यांमध्ये ही झाडं हळूहळू बारसं धरू लागल्याचे दिसत आहे.

  • झाडं आणि निसर्गाबाबत मुलांना गोडी लागावी म्हणून -

कधीकाळी कचरा वेचणारे हेच चिमुकले हात आता निसर्गाच्या रक्षणासाठीही पुढे सरसावले आहेत. ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. आता खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षण संवर्धणासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज असल्याचे या उपक्रमातून दिसून आले आहे. तर मुलांना लहानपणापासून झाडं आणि निसर्गाबाबत गोडी लागण्यासह त्यांच्यामध्ये पर्यावरण रक्षणाचे भानही जागृत करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे अनुबंध संस्थेचे विशाल जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा -विधानसभा अध्यक्ष येत्या अधिवेशनात निवडला जाणार, तर अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार - बाळासाहेब थोरात

Last Updated : Jun 30, 2021, 6:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details