महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Case Against Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ; कळव्यात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा येथील रहिवाश्यांच्या तक्रारीवरून कळवा पोलीस ठाण्यात आव्हाडांसह त्यांच्या दोन समर्थकांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. कळवा भास्कर नगर मधील जय दुर्गा माता मंदिराची देखभाल करणाऱ्या सविता सिंग यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case Filed Against MLA Awhad
जितेंद्र आव्हाड

By

Published : Apr 25, 2023, 10:20 PM IST

ठाणे:कळवा पूर्वेकडील भास्कर नगरमध्ये जय दुर्गा माता मंदिराच्या आवारात एक बोअरवेल असून आजुबाजूची जवळपास 30 कुटुंबे येथील पाणी वापरतात. मंदिर परिसरात कोणी घाण करू नये म्हणून सविता सिंग यांनी संरक्षक जाळीला कुलुप लावले आहे. नागरिकांना याचा त्रास होत असल्याने कुलुप तोडण्याची मागणी या परिसरातील अरविंद गुप्ता आणि आल्हाद सिंग यांनी केली होती; मात्र सविता यांनी ही मागणी धुडकावून लावली. यामुळे गुप्ता आणि आल्हाद सिंग यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे याबद्दल तक्रार केली.

दार तोडल्याचा आरोप: जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या दोन समर्थकांनी दमदाटी करून लोखंडी दार तोडल्याचा आरोप सविता सिंग यांनी केला. तसेच याप्रकरणी त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने पोलिसांना आव्हाडांसह दोघा समर्थकांविरोधात कलम ४२७ व ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आव्हाड वादाच्या भोवऱ्यात:राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरुन वाद पेटण्याची चिन्ह आहेत. मनवमी, हनुमान जयंती फक्त दंगल घडवण्यासाठीच का? असा सवाल त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिबिरात बोलतांना केला होता. त्यावरुन भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर हिंदू सणांचा अवमान केल्याचा ठपका भाजपने ठेवला आहे.

दंगलीवरून टीका:रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील इतर भागात उसळलेल्या दंगलीच्या घटनांबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. रामनवमी, हनुमान जयंती केवळ राज्यात दंगल घडवण्यासाठी असल्याचे दिसते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी दंगलीच्या घटनांवरून एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली. रामनवमीला संभाजीनगरमध्ये दंगल झाली. राम नवमी, हनुमान जयंतीला, दंगली नेहमीच होतात. सत्ताधारी युवकांना नोकरी देऊ शकत नाही. राज्यातील महागाई कमी करता न आल्याने सत्ताधाऱ्यांना धार्मिक कार्यक्रम करून मते मिळवण्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा:Shivaji Maharaj Statue In Mauritius: 'या' देशाने उभारला शिवरायांचा पुतळा; २८ एप्रिलला भव्य लोकार्पण सोहळा

ABOUT THE AUTHOR

...view details