महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तटरक्षक दलाला 'देवसंदेश' बोट सापडली; सर्व खलाशी सुखरूप - भारतीय तटरक्षक दल न्यूज

भाईंदर पश्चिमेतील उत्तन बंदरातील १५ खलाशी २ ऑगस्टला 'देवसंदेश' बोट घेऊन अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. परंतु हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे सदर बोट घेऊन खलाशी ४ ऑगस्टला उत्तन बंदरावर परत येण्यासाठी निघाले. परतीचा प्रवास करताना ४ ऑगस्टला दुपारी साडेतीनच्या दरम्यान बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोट समुद्रात अडकून पडली.

Devasandesh Boat
देवसंदेश बोट

By

Published : Aug 6, 2020, 7:02 PM IST

ठाणे(मीरा भाईंदर) - मासेमारीसाठी गेलेली देवसंदेश ही बोट दोन दिवसांपासून इंजिन बिघडल्याने अरबी समुद्रात अडकून पडली होती. त्या बोटीचा शोध घेण्याचे काम सुरू होते. अखेर भारतीय तटरक्षक दलाला बोटीपर्यंत पोचण्यात यश आले आहे. बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप असून त्यांना मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर उतरवण्यात आले आहे.

देवसंदेश बोट सापडली

भाईंदर पश्चिमेतील उत्तन बंदरातील १५ खलाशी २ ऑगस्टला 'देवसंदेश' बोट घेऊन अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. परंतु हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे सदर बोट घेऊन खलाशी ४ ऑगस्टला उत्तन बंदरावर परत येण्यासाठी निघाले. परतीचा प्रवास करताना ४ ऑगस्टला दुपारी साडेतीनच्या दरम्यान बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोट समुद्रात अडकून पडली. त्यावेळी समुद्र खवळलेला असल्याने खलाशी बोटीवरून खाली उतरून इंजिनमध्ये झालेला बिघाड दुरूस्त करू शकले नाहीत. बोटीचे मालक नेस्टर अंतोनी मुनिस यांनी वायरलेसद्वारे याबाबत उत्तन सागरी पोलिसांना माहिती दिली.

उत्तन पोलिसांनी याची माहिती मुंबईतील भारतीय तटरक्षक दलाला दिल्यानंतर बोटीचा शोध सुरू झाला. नौदल, तटरक्षक दल, मत्स्य विभाग, जिल्हाधिकारी आणि उत्तन पोलिसांच्या मदतीने तटरक्षक दल बोटीपर्यंत पोहचले. मात्र, खलाशी बोट सोडून येण्यास तयार नव्हते त्यामुळे अडचण निर्माण झाली. बोट नवीन असून गेल्यावर्षीच बनवली आहे, त्यामुळे बोट घेऊन चला, अशी मागणी खलाशांनी केली. मात्र, हवामान बिघडल्याने बोट टोईंग करून किनाऱयावर आणने अवघड होते. समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीत बोट किनाऱ्यावर नेण्यास तांत्रिक अडचण असल्याने तटरक्षक दलाकडून स्पष्ट करण्यात आले. अखेर तटरक्षक दलाच्या जवानांनी मच्छीमारांची समजूत घालून त्याना तटरक्षक दलाच्या बोटीवर घेतले. व त्यांना मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर सुखरुप उतरवले.

देवसंदेश बोट उत्तनबंदरापासून ४५ किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात होती. त्यामुळे तटरक्षक दलाने मच्छीमारांना भाऊच्या धक्क्यावर उतरवले. कारण बोटीपासून उत्तन बंदराचे अंतर जास्त आहे. दरम्यान, देवसंदेश बोट समुद्रात नांगर टाकून ठेवण्यात आली आहे. समुद्रातील परिस्थिती लक्षात घेता बोट किनाऱ्यावर आणू शकलो नाही, अशी माहिती उत्तन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details