महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपक्ष आमदार गीता जैन शनिवारी 'शिवबंधन' हाती बांधणार - independent mla geeta jain will join shivsena

भाजपात असलेल्या गीता जैन यांनी बंडखोरी करत विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती. यात जैन यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचा दणदणीत पराभव केला होता.

independent mla geeta jain
अपक्ष आमदार गीता जैन

By

Published : Oct 24, 2020, 3:09 AM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - अपक्ष आमदार गीता जैन शनिवारी शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गीता जैन या मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करतात.

भाजपात असलेल्या गीता जैन यांनी बंडखोरी करत विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती. यात जैन यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचा दणदणीत पराभव केला होता.

दरम्यान, भाजपाच्या बंडखोर आमदार गीता जैन यांच्यासोबत मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक आहेत. तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर हा भाजपाला मोठा धक्का मानावा लागेल.

तर शुक्रवारीच माजीमंत्री एकनाथ खडसे यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. आता त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधल्याने ते पुन्हा एकदा नव्याने राजकारणात सक्रिय होतील, असा अंदाज बांधला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details