ठाणे - उल्हासनगर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची कारवाई आता तीव्र झाली आहे. गेल्या दोन दिवसामध्ये ७० मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा हिसका दाखवत कायद्याप्रमाणे दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उल्हासनसगर झोनचे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता तोडेवाड यांनी दिली.
माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता तोडेवाड हेही वाचा -धक्कादायक..! रेल्वे उद्धघोषकाचा व्हिडिओ व्हायरलकरून आत्महत्येचा प्रयत्न
ख्रिसमसपासूनच कारवाईला सुरुवात
कोरोनाचा धोका अद्यापही टळला नसल्याचे राज्य सरकारने जाहीर करून सार्वजनिक ठिकाणी नववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यातच गेल्या आठ महिन्यापासून वाहतूक पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली जात नव्हती. मद्य प्राशन करून वाहन चालविल्यामुळे अपघातांची संख्या वाढण्याची भीती असल्याने २५ डिसेंबरपासून वाहतूक पोलिसांनी ही कारवाई पुन्हा सुरू केली. वाहन चालकांची सुरक्षित पद्धतीने तपासणीसाठी वाहतूक पोलिसांनी पीपीई किटसह विशेष कार्यपद्धती निश्चित केली. यामध्ये श्वास विश्लेषकाचे नोजलही प्रत्येक वेळी बदलण्यात येते. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसामध्ये उल्हासनगर परिमंडळ हद्दीत १५० पेक्षा जास्त मद्यपी चालकांवर कारवाई झाल्याचे सांगण्यात आले.
ठिकठिकाणी नाकाबंदी
भिवंडी, कल्याण, डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर आदी ठिकाणी केलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान गेल्या पाच दिवसात बहुतांश चालक मद्य प्राशन करून वाहन चालवताना आढळले. ही कारवाई या पुढेही अधिक तीव्र होणार असून कोणीही मद्य प्राशन करून वाहन चालवू नये किंवा मद्यपी वाहन चालकासोबत प्रवास करू नये, असे आवाहन वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता तोडेवाड यांनी केले.
हेही वाचा -प्रेमप्रकरणातून खून : कचऱ्याच्या ढिगाखाली आढळला मृतदेह