ठाणे:भिवंडी शहर व ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरुच आहे. वळ ग्रामपंचायत हद्दीतील एका गोदामाला भीषण आग लागली होती. तर काल रात्री दापोडा ग्रामपंचायत हद्दीमधील इंडियन कारपोरेशन येथील मोजे बनविणाऱ्या कंपनीला भिषण आग लागली. तर आज पहाटे वडपे ग्रामपंचायत हद्दीत एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Fire In Bhiwandi: भिवंडीत आगीच्या दोन भीषण घटनेत ३ कामगार होरपळून गंभीर - तीन कामगार जखमी
भिवंडी गोदाम पट्ट्यात ( Bhiwandi warehouse belt ) आगीचे सत्र सुरुच ( The fire season continues ) आहे. शुक्रवारी पहाटे वडपे ग्रामपंचायत हद्दीत एका गोदामाला भीषण आग ( Warehouse fire ) लागल्याची घटना घडली. यात गोदामात झोपलेले तीन कामगार होरपळून गंभीर जखमी ( Three workers injured ) झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
![Fire In Bhiwandi: भिवंडीत आगीच्या दोन भीषण घटनेत ३ कामगार होरपळून गंभीर fire in Bhiwandi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14121545-635-14121545-1641547862549.jpg)
इंडियन कारपोरेशन येथील मोजे बनविणाऱ्या कंपनी आहे. या कंपनीला काल रात्री भिषण आग लागली. सोक्सको असे या कंपनीचे नाव असून गोदामातील मोजे व कंपनीतील लाखोंच्या मशनरी जळून खाक झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ठाणे, भिवंडी येथील तीन बंब दाखल झाले. त्यांनतर ३ तासाने ही आग आटोक्यात आली. मात्र कंपनीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
मुंबई नाशिक मार्गावरील वडपा ग्रामपंचायत हद्दीत एका गोदामाला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात गोदामात झोपलेले तीन कामगार आगीत होरपळून गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यापूर्वीच गोदामात अडकलेल्या इतर कर्मचाऱ्यांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.