नवी मुंबई - खड्डेमय रस्ते आपणास अनेक ठिकाणी पहायला मिळतात. वेळीच खड्डे न बुजवल्याने अनेकांचा जीवही रस्त्यावरील खड्ड्याने गेला आहे. पण, नवी मुंबईत खड्डे नसलेल्या रस्त्यावरही खड्डे बुजवण्याचे काम संबंधित प्रभागातील नगरसेविकेच्या माध्यामातून सुरू आहे. नवी मुंबईत येत्या एप्रिलमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे गरज नसतानाही अशी कामे केली जात आहेत.
खड्डे नसतानाही नवी मुंबईत खड्डे बुजविण्याचे काम सुरू - नगरसेविका सपना गावडे
नवी मुंबईत खड्डे नसलेल्या रस्त्यावरही खड्डे बुजवण्याचे काम संबंधित प्रभागातील नगरसेविकेच्या माध्यमातून सुरू आहे.
नवी मुंबईतील एल एन टी परिसरात प्रभाग क्र. 98 मध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुठेही खड्डे व खराब रस्ता झालेला नसतानाही डांबर टाकण्याचे काम सुरू होते. बरेच डांबराचे पट्टे मारून ठेवलेले आहेत. संबधीत वॉर्डातील नगरसेविका सपना गावडे आहेत. यामध्ये महापालिकेचा पैसा फुकट जात आहे. नगरसेविका सपना गावडे जनतेला मूर्ख बनवायचे काम करत आहेत, असा आरोप भाजपच्या पदाधिकारी मंगल घरत यांनी केले आहेत.
हेही वाचा - 'जेवताना मोबाईलवर बोलू नको', वडिलांनी बजावल्यामुळे तरुणीची आत्महत्या