ठाणे - ठाण्यातील आंबेडकर रस्त्यालगत असलेल्या तीन दुकानांना अचानक लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक झाली आहेत. घटनास्थळी पोहचत विद्युत विभाग, राबोडी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
ठाण्यात रस्त्यावरील दुकानांना आग; आगीत दुकाने जळून खाक - ठाण्यात दुकानांना आग
राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि आंबेडकर रस्त्यालगत चित्रकुटी सोसायटी ठाणे पश्चिम याठिकाणी अचानक दोन दुकानांना आग लागली. दुकानासह या आगीत एक भंगारातील दुचाकी आणि टेम्पो जाळून खाक झाले आहेत.
राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि आंबेडकर रस्त्यालगत चित्रकुटी सोसायटी ठाणे पश्चिम याठिकाणी अचानक दोन दुकानांना आग लागली. दुकानासह या आगीत एक भंगारातील दुचाकी आणि टेम्पो जाळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विद्युत विभाग, राबोडी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाने मदत कार्य करीत दोन फायर इंजिन, एक रेस्क्यू व्हॅन, दोन पाणी टँकर यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. जळालेल्या दुकानात इंटरनेटचे ऑफिस असून ते प्रणय जगताप यांच्या मालकीचे आहे. तर फळांचे दुकान द्वारका प्रसाद गुप्ता यांच्या मालकीचे आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही शॉर्टसर्किटने ही आग लागल्याची माहिती आहे.