महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे : भिवंडीत लसीकरणापूर्वीच लसींचा तुटवडा - भिवंडीत लसींचा तुटवडा

१ मेपासून १८ वर्ष वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. अशावेळी मनपाकडे लसींचा अपुरा साठा असल्याने दोन दिवसात भिवंडी मनपा लसीकरणाचे नियोजन कशा पद्धतीने करणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

भिवंडीत लसींचा तुटवडा
भिवंडीत लसींचा तुटवडा

By

Published : Apr 29, 2021, 6:05 PM IST

ठाणे - शासनाकडून ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांची कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, भिवंडी मनपाच्या कार्यक्षेत्रात सध्या लसींचा साठा अपुरा असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. लसीचा साठा अपुरा असल्याने भिवंडीत फक्त दोनच ठिकाणी लस देण्यात येणार आहे.अपुऱ्या लस साठ्यामुळे भिवंडीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

इतक्या ठिकाणी होती लसीकरणाची सुविधा

भिवंडी शहरात ४५ वर्ष वयोगटातील व त्यावरील नागरिकांसाठी लसीकरणाची महापालिकेच्या वतीने स्व इंदिरा गांधी रुग्णालय, खुदाबक्ष हॉल, भाग्य नगर, ईदगाह नागरी आरोग्य केंद्र, मिल्लत नगर नागरी आरोग्य केंद्र, नवी वस्ती नागरी आरोग्य केंद्र, देवजी नगर नागरी आरोग्य केंद्र, कामतघर गाव नागरी आरोग्य केंद्र, प्रभाग समिती ३ पद्मानगर व शिवाजी नगर स्टाफ क्वार्टर भाजी मार्केट, संगमपाडा अशा दहा ठिकाणी महापालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र उभारण्यात आले होते. मात्र, मनपाकडे लसींचा साठा अल्प असल्याने फक्त स्व इंदिरा गांधी रुग्णालय व खुदाबक्ष हॉल या दोन ठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लसीकरण करता येणार आहे.

१ मेपासून लसीकरणाचे नियोजन कसे होणार?

भिवंडीत कामगार वस्ती व बहुतांश दाट लोकसंख्या असल्याने याठिकाणी लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याने शहरात लसींचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे. मात्र,मनपा प्रशासनाकडे असलेला लसींचा साठा अपुरा असल्याने शहरातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे १ मेपासून १८ वर्ष वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. अशावेळी मनपाकडे लसींचा अपुरा साठा असल्याने दोन दिवसात भिवंडी मनपा लसीकरणाचे नियोजन कशा पद्धतीने करणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details