दुचाकीला बेस्टची धडक, महिलेचा मृत्यू - ठाणे अपघात
या अपघातात दुचाकीवरील ३५ वर्षीय समीक्षा परब यांचा मृत्यू झाला. बेस्टच्या खाली सापडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून बेस्ट बसचालक अनिल थोरात (वय ४५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
ठाणे- ठाण्यातून मुंबईच्या दिशेला निघालेल्या दुचाकीला बेस्ट बसने मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील ३५ वर्षीय समीक्षा परब यांचा मृत्यू झाला. बेस्टच्या खाली सापडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून बेस्ट बसचालक अनिल थोरात (वय ४५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
मंगळवारी संध्याकाळी समीक्षा परब या मुंबईच्या दिशेने पतीसह दुचाकीवरून जात असताना इस्टर्न द्रुतगती महामार्गावर गुरुद्वारच्या समोरील रस्त्याच्या बाजूला दुचाकीला बेस्ट बसने धडक दिली. समीक्षा परब या खाली पडल्या आणि मागून येणाऱ्या बेस्ट बसखाली सापडल्या. या विचित्र अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून नौपाडा पोलिसांनी बेस्ट चालक अनिल थोरात यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात प्रदीप सैम प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. नौपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.