महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यातील म्हसा यात्रेला 350 वर्षांची परंपरा; मात्र, यंदा अवकाळी पावसाचा परिणाम - thane mhasa yatra

मुरबाड तालुक्यात म्हसा गावी दरवर्षी पौष पौर्णिमेला म्हसोबाची सर्वात मोठी यात्रा भरते. म्हसोबाचे आणि खांबलिंगेश्वराच्या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक म्हसा गावी येतात. जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील प्रसिद्ध अशा म्हसा यात्रेला 2 दिवसांपूर्वी 11 जानेवारीला सुरुवात झाली आहे.

Impact of premature rainfall on 350 years old yatra festival in thane
ठाण्यातील म्हसा यात्रेला 350 वर्षांची परंपरा

By

Published : Jan 13, 2020, 8:24 PM IST

Updated : Jan 13, 2020, 11:28 PM IST

ठाणे - मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध म्हसा यात्रेला साडेतीनशे वर्षाची परंपरा लाभली आहे. मात्र, यंदा झालेल्या अवकाळी पावसाचा फटका जनावरे, शेतीची अवजारे, टोपल्या, घोंगडी विक्रेत्यांना बसल्याचे पाहावयास मिळत आहे.

ठाण्यातील म्हसा यात्रेला 350 वर्षांची परंपरा; मात्र, यंदा अवकाळी पावसाचा परिणाम

मुरबाड तालुक्यात म्हसा गावी दरवर्षी पौष पौर्णिमेला म्हसोबाची सर्वात मोठी यात्रा भरते. म्हसोबाचे आणि खांबलिंगेश्वराच्या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक म्हसा गावी येतात. जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील प्रसिद्ध अशा म्हसा यात्रेला 2 दिवसांपूर्वी 11 जानेवारीला सुरुवात झाली आहे. ही यात्रा १२ ते १५ दिवस चालणार आहे. यात्रेला महाराष्टातूनच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यातून लाखोच्या संख्यने यात्रेकरू येतात. ही यात्रा किमान ३ ते ४ किलोमीटर परिसरात भरते.

हेही वाचा -मुंबईत बेकायदेशीर आरएमसी प्रकल्पाबाबत पालिका अनभिज्ञ

यात्रेच्या निमित्ताने भरतो बैलांचा खरेदी-विक्री बाजार -

या यात्रेत मोठ्या प्रमाणात बैलांची खरेदी-विक्री होते. यामध्ये म्हशी, घोडे, गायीची ही मोठ्या प्रमाणात विक्री होते. याठिकाणी देशी, खिल्लारी, बुटक्या, जाडसर देशी बैलांपेक्षा उंच, काटक देखणी बैल लक्ष वेधून घेतात. शर्यतीच्या बैलांच्या किंमती २० हजार रुपयांपासून ते लाखांच्या घरात जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राज्यात बैल शर्यतीवर बंदी असल्याने त्याचा परिमाण बैल बाजारावर झाला असल्याचे बैल विक्रेत्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -'सरकारने दूध धंधा वाढविण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना करावी'

टोपल्यांचा बाजार यात्रेचे वैशिष्ट्य -

टोपली बाजार हेही यात्रेचे वैशिष्ट आहे. बांबूच्या टोपल्या बनवणारे ठाकूर मोठ्या संख्येने यात्रेत हजेरी लावतात. बाजारात टोपल्यांची मोठी उलाढाल होते. लहान-मोठ्या आकाराच्या टोपल्या, विविध आकाराच्या करंड्या याठिकाणी दिसतात. तसेच घरात महिला वर्गाला लागणाऱ्या उखळ, सूप आणि शेतीसाठी लागणारे अवजारे कोयता, खुरपणी, कुऱ्हाड, बांबू या वस्तूही यात्रेत विक्रीसाठी आहेत. मात्र, पूर्वीपेक्षा या साहित्याचे दर वाढल्याने त्याचा फटका यात्रेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना बसला आहे. तर बहुतांश आदिवासी बांधव दुर्गम भागातून विविध साहित्य विक्रीसाठी घेऊन येतात. अशा परिस्थितीत अवकाळी पावसाचा परिणाम झाल्याने यंदाच्या जत्रेला त्यांच्याही व्यवसायाला मंदीचा फटका बसला असल्याचे आदिवासी विक्रेत्याने सांगितले.

मेंढीच्या लोकरीच्या अस्सल घोंगड्या यात्रेत विक्रीसाठी असतात. हे देखील यात्रेचे आकर्षण आहे. मात्र, अलीकडे नवनवीन सिंथेटिक ब्लँकेट्स, चादरी, गोधड्यांचे प्रमाण वाढल्याने अस्सल घोंगडीवाले येथे मोजकेच पाहायला मिळाले. यामुळे घोंगड्यांची विक्री निम्यावर आली आहे. विणलेल्या आणि लाटीव अशा 2 प्रकारच्या घोंगड्या येथे मिळतात.

तसेच यात्रेत मिठाईचा बाजार भरतो. यातील हातोली आणि जामून या मिठाईला मोठी मागणी असते. दूरवरून आलेले यात्रेकरू मिठाई घेण्यासाठी भेट देतात. विशेष म्हणजे येथे मिळणारी मिठाई इतर ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने ताजी मिठाईसाठी खवय्ये येथे न चुकता येतात. यात्रेकरू 2 ते 3 दिवस मुक्कामी करत असल्यामुळे यामुळे त्यांच्यासाठी परिसरातच चिकन, मटणाची दुकाने थाटली आहेत. तंबू ठोकून यात्रेकरू गावरान जेवणाचा आनंद घेतात. अशाप्रकारे यात्रेच्या निमित्ताने शहरी वातावरणातून आलेले यात्रेकरूंना एक आगळा वेगळा आनंद यात्रेच्या निमित्ताने मिळतो. मात्र, यावेळी अवकाळी पावसाचा फटका यात्रेवर जाणवत आहे.

Last Updated : Jan 13, 2020, 11:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details