महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वातावरण बदलाने ठाणेकर आजारी; मात्र डेंग्यूच्या संख्येत घट - डेंग्यू बातमी ठाणे

ठाणेकरांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाय योजना केल्या गेल्या. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेचे आरोग्य विभाग सज्ज होते.

illness-increase-due-to-climate-change-in-thane
illness-increase-due-to-climate-change-in-thane

By

Published : Jan 3, 2020, 8:52 AM IST

ठाणे - पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाय योजना करण्यात येतात. तरीही आरोग्यावर दरवर्षी महासभेत चिरफाड होत असते. मागील 9 वर्षात आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असला तरी डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत यंदा घट झाल्याचे आढळून आले आहे. यंदा महापालिका हद्दीत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 114 होती. हीच संख्या 2015 मध्ये 470 एवढी आढळून आली होती. तर मलेरियाच्या रुग्णांची संख्या यंदा 382 एवढी आढळून आली आहे.

डेंग्यूच्या संख्येत घट

हेही वाचा-अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, हजारो क्विंटल धान भिजले

जनजागृतीसाठी दीड लाख भित्ती पत्रके

ठाणेकरांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या गेल्या. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेचे आरोग्य विभाग सज्ज होते. फायलेरीया विभागाचे 210 अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि प्रत्येक आरोग्य केंद्रातील 150 कर्मचारी पावसाळ्यात विशेष लक्ष ठेवून होते. एखाद्या ठिकाणी साथीच्या रोगांची वाढ झाल्यावर त्या भागात जाऊन आरोग्य केंद्रातील कर्मचारी प्रत्येकाचे रक्त नमूने तपासून, त्याच ठिकाणी उपचार करणार येत होते. याशिवाय दीड लाख भित्ती पत्रके तयार करण्यात येऊन ती वाटप करण्यात आली होती.

मच्छरांची पैदास वाढू नये यासाठी उपाययोजना

विकासकांच्या कामांच्या ठिकाणी देखील खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच ज्या विकासकांची नव्याने कामे सुरू आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. याशिवाय घरोघरी जाऊन पाण्याचे नमुने तपासणे, जनजागृती करणे, असे कामही या माध्यमातून केले गेले. तसेच मच्छरांची पैदास वाढू नये म्हणून खासगी आणि सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी पाईपला नायलॉन जाळ्या बसविण्याचे कामही केली होते. याशिवाय इतर उपाय योजना देखील आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहेत. त्यामुळेच यंदा साथीच्या रोगांची जास्त समस्या ठाण्यात आढळून आली नसल्याचे प्रशासन सांगत आहे. शहरात यंदाच्या वर्षात डेंग्यूचे 114 रुग्ण आढळले आहेत. तर मलेरीयाचे 382 रुग्ण आढळले आहेत. तर हत्तीरोगाचे 11 रुग्ण आढळले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details