महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिस्तुलासह गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस विक्रीसाठी आलेला तस्कर गजाआड - dombivli latest news

खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या ठिकाणी परिसरात सापळा रचून आरोपी सागर सिंग याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती व त्याच्याजवळ असलेल्या एका प्लास्टिक पिशवीत झडती घेतली असता एक पिस्तूल, एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आढळून आले.

ठाणे
ठाणे

By

Published : Dec 3, 2020, 3:25 PM IST

ठाणे -एका पिस्तुलासह गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस घेऊन डोंबिवलीत विक्रीसाठी आलेल्या तस्कराला गजाआड करण्यात कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सागर देवीप्रसाद सिंग (३०, रा. गावदेवी मंदिर रोड, डोंबिवली पूर्व) असे आरोपी तस्कराचे नाव आहे.

सापळा रचून कारवाई

डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा ते भोपर गावाच्या कामिनी परिसरात एक व्यक्ती अवैध शस्त्रसाठा विक्रीसाठी आणणार असल्याची गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मृदगून, मारोती दिघे, पो. ह. दत्ताराम भोसले, अरविंद पवार, अजित राजपूत, मंगेश शिर्के, प्रकाश उर्फ बाळा पाटील, हरिचंद्र बंगारा यांनी काल सायंकाळच्या सुमारास खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या ठिकाणी परिसरात सापळा रचून आरोपी सागर सिंग याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती व त्याच्याजवळ असलेल्या एका प्लास्टिक पिशवीत झडती घेतली असता एक पिस्तूल, एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आढळून आले. त्यांनतर गुन्हे पथकातील पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात विवीध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

कोणाचा गेम करण्यासाठी की गुन्हेगाराला विकण्यासाठी?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाचा गेम करण्यासाठी पिस्तूल व गावठी कट्टा घेऊन आला होता का, कोणा गुन्हेगाराला विकण्यासाठी आला होता, शिवाय या आरोपी तस्कराचे कोण्या गुन्हेगारी टोळीशी कनेक्शन आहे का, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मृदगून करत आहे. तर आज आरोपी तस्कराला न्यायालयात हजर केले असता ५ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details