नवी मुंबई (ठाणे) - पनवेल परिसरातील ग्रामीण भागात अवैध रितीने गावठी दारू बनविण्याची हातभट्टी पनवेल शहर पोलिसांच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यात आली. ही दारू बनविण्यासाठी तिथे उपस्थित पुरुष व महिलांना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून तळीरामांचा कल हा गावठी दारू पिण्याकडे वाढला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गावठी दारू बनवण्याचं प्रमाण वाढलं आहे. पनवेल तालुक्यातील पाडेघर गावच्या हद्दीत देखील अशाच प्रकारे अवैधरित्या हातभट्टीद्वारे गावठी दारूची निर्मिती करण्यात येत होती.
पनवेल शहर पोलिसांचा गावठी हातभट्टी दारूवर छापा - पनवेल शहर पोलिसांचा गावठी हातभट्टी दारू वर छापा
अवैध रितीने गावठी दारू बनविण्याची हातभट्टी पनवेल शहर पोलिसांच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यात आली. ही दारू बनवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पनवेल तालुक्यातील पाडेघर गावच्या हद्दीत देखील अशाच प्रकारे अवैधरित्या हातभट्टीद्वारे गावठी दारूची निर्मिती करण्यात येत होती.
![पनवेल शहर पोलिसांचा गावठी हातभट्टी दारूवर छापा illegal-local-liquor-seized-by-police-in-Panvel](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7033090-130-7033090-1588429446380.jpg)
पनवेल शहर पोलिसांचा गावठी हातभट्टी दारू वर छापा
पनवेल शहर पोलिसांचा गावठी हातभट्टी दारू वर छापा
पनवेल शहर पोलिसांनी या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून हातभट्टी उद्ध्वस्त केली. पोलिसांनी या कारवाईत 58 हजारांची गावठी दारू उद्ध्वस्त केली असून, 14,500 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. यासोबतच पोलिसांनी अवैधरित्या हटभट्टीवर गावठी दारू बनविणाऱ्या 6 आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुख्य म्हणजे यात 5 महिलांंचा समावेश आहे.