ठाणे -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीसह लॉकडाऊनमुळे देशी, विदेशी दारूची दुकाने बंद आहेत. याचाच फायदा घेऊन मुरबाड तालुक्यात गावठी दारूच्या हातभट्ट्या मोठ्या प्रमाणात फोफावल्याची माहिती पोलिसांना मिळताच मुरबाड पोलिसांनी जंगलातील गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर धडक कारवाई करत उद्ध्वस्त केल्या आहेत.
मुरबाडच्या जंगलातील गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त - ठाणे दारू अड्डा बातमी
तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळवला आहे. त्यातही गावठी दारूची एक बाटली २०० रुपयांत विक्री होत आहे. त्यामुळे दारूमाफियांनी खोटेघर गावाच्या परिसरातील जंगलात गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू केल्या होत्या.
लॉकडाऊनमुळे मुरबाड तालुक्यातील सरकारमान्य देशी, विदेशी दारूची दुकाने बंद आहेत. यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळवला आहे. त्यातही गावठी दारूची एक बाटली २०० रुपयांत विक्री होत आहे. त्यामुळे दारूमाफियांनी खोटेघर गावाच्या परिसरातील जंगलात गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू केल्या होत्या.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मुरबाड पोलिसांना मिळाली. या माहितीआधारे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकम, पोलीस कर्मचारी आर. आर. तडवी, के. एस. पाटील यांनी खाटेघर येथील जंगलात जाऊन गावठी दारूसाठी लागणारा सुमारे 65 हजारांचा मुद्देमाल घटनास्थळी नष्ट करून हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईपूर्वी दारू माफियांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळ काढला होता, तर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गावठी दारू हातभट्टी मालकांचे धाबे दणाणले आहेत.