ठाणे- गेल्या दहा वर्षापासून बदलापूरमधील नेरकर कुटुंबीयांकडून विविध सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्यात येते. यंदा नेरकर कुटुंबीयांनी वाचन संस्कृती वाढीसाठीचा संदेश देणारा देखावा साकारला आहे. 'वाचाल तर वाचाल' हा संदेश देत असताना पुस्तकांच्या गराड्यात बसलेली आणि पुस्तक वाचत असलेले आकर्षक गणेश मूर्ती नेरकर कुटुंबीयांच्या घरात विराजमान झाली आहे.
ठाण्यात 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारे बाप्पाची स्थापना - idol of ganesha reading book was palced in thane
नेरकर कुटुंबीयांनी वाचन संस्कृती वाढीसाठीचा संदेश देणारा देखावा साकारला आहे. 'वाचाल तर वाचाल' हा संदेश देत असताना पुस्तकांच्या गराड्यात बसलेली आणि पुस्तक वाचत असलेले आकर्षक गणेश मूर्ती नेरकर कुटुंबीयांच्या घरात विराजमान झाली आहे.
पुस्तकांचे महत्त्व सांगणारा हा देखावा परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तीन महिन्यापूर्वीच हा देखावा साकारण्याचे नक्की झाल्यानंतर बदलापूर गावातील मूर्तीकार रवी कुमार यांना नेरकर कुटुंबीयांकडून याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी शाडूच्या माती आणि काथ्या असलेली हलकी आणि स्वस्त गणेशमूर्ती बनवून दिल्याचे पुंडलिक नेरकर यांनी सांगितले.
आताची पिढी गेल्या काही वर्षात माहितीसाठी इंटरनेट, व्हाट्सअॅप सारख्या माध्यमांवर अवलंबून असतात. मात्र पुस्तके हेच खरे माहितीचे स्रोत असून कमी झालेल्या वाचन संस्कृतीला वाढ मिळावी यासाठी हा देखावा साकारण्याचे नेरकर यांनी सांगितले. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आमचे हे दहावे वर्ष आहे. टाकाऊतून टिकाऊ करण्याच्या प्रयोगांमुळे वाढत्या महागाईतही आम्ही आकर्षक आणि कमी किमतीत सामाजिक संदेश देणारे देखावे उभारू शकल्याचेही नेरकर यांनी सांगितले.