ठाणे - तरसाने कुत्र्यासह चार पिल्लांचा फडशा पाडल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. भिवंडी तालुक्यातील पडघा वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या दाभाड जंगल परिसरात ही घटना घडली.
हेही वाचा - केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत करावी - फडणवीस
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे, वन कर्मचारी बाबासाहेब खरे, रामदास गोरले, अशोक काटसकर, विलास निकम, जे. जी. भोईर, प्रमोद सुतार, विष्णू असवले यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या संशयाने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा- आंध्र प्रदेशात छेड काढणाऱ्या तरुणाची तरुणीकडून चप्पलने धुलाई