महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime : धक्कादायक! नांदायला येत नसल्याच्या वादातून ज्यूसमध्ये विष पाजून पत्नीला ठार मारण्याचा पतीचा प्रयत्न

पत्नी नांदायला सासरी येत नसल्याच्या वादातून पतीने ज्यूसमधून विष पाजून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी पती हा पत्नी काम करीत असलेल्या साई दत्ता कृपा इमारतीच्या मेनगेटवर आला. त्यावेळी कामावर असताना तिला तिच्या ऑफिसमधून बाहेर बोलावले. त्यानंतर अचानक बळजबरीने विषारी औषध मिश्रित ज्यूस पाजून तिला ठार मारण्याचा प्रयत्न ( Husband tried to kill his wife ) केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 3, 2022, 10:29 PM IST

Updated : Dec 4, 2022, 8:14 AM IST

ठाणे :पत्नी नांदायला सासरी येत नसल्याच्या वादातून पतीने ज्यूसमधून विष पाजून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा ( Husband tried to kill his wife ) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार डोंबिवली पश्चिम भागातील एका इमारतीच्या मुख्य प्रवेश दारावर घडला आहे. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात पती विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. कृष्णकांत पांडे असे अटक केलेल्या पतीचे नाव असून तो बोरिवली परिसरातील रहिवासी आहे.

पत्नीला मारण्याचा प्रयत्न - तक्रारदार अंजली (वय २३) ही दिवा भागात राहणारी असून तिचा विवाह बोरिवलीत राहणाऱ्या आरोपी कृष्णकांतशी झाला. मात्र काही घरगुती वादातून पत्नी त्याला सोडून दिवा भागातील आपल्या माहेरी राहत असून ती डोंबिवली पश्चिम भागातील एका खाजगी कंपनीत नोकरी करीत आहेत. त्यातच ३० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास आरोपी पती हा पत्नी काम करीत असलेल्या साई दत्ता कृपा इमारतीच्या मेनगेटवर आला. त्यावेळी कामावर असताना तिला तिच्या ऑफिसमधून बाहेर बोलावले. त्यानंतर अचानक बळजबरीने विषारी औषध मिश्रित ज्यूस पाजून ( juice laced with poison ) तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सहायक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे सदरील घटनेबाबत माहिती देताना

आरोपी पतीला अटक - मात्र पत्नीने आरडाओरडा करताच ऑफिस मधील नागरिकांनी तिच्याकडे धाव घेऊन आरोपी कृष्णकांत पांडेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर पत्नी अंजलीला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी कृष्णकांतला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात पत्नीच्या तक्रारी वरून भादंवि कलम ३०७, ३२८, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास साहा. पोलीस निरीक्षक जी एस. वडणे करीत आहेत.

Last Updated : Dec 4, 2022, 8:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details