खळबळजनक! जादू टोण्याच्या भीतीने नवऱ्याने बायकोच्या गळ्यावर केले चाकूने वार - ठाण्यात नवऱ्याचे बायकोवर सुरीने वार
किरकोळ कारणावरुन जादू टोण्याच्या भीतीने नवऱ्याने बायकोच्या गळ्यावर भाजी कापण्याच्या चाकूने वार ( husband stabbed wife ) केले. ही घटना भिवंडीतील कारिवली गावातील वरलीपाडा येथील एका घरात घडली आहे. त्यानंतर जखमी अवस्थेत बायकोला सोडून नवऱ्याने पलायन केले आहे. भोईवाडा पोलीस ( Bhoiwada police station ) आरोपी नवऱ्याचा शोध घेत आहेत.
ठाणे: कोणी तरी तुझ्यावर जादूटोणा केला. त्यामुळे तू मला परेशान करतीस असा वाद घालून नवऱ्याने बायकोच्या गळ्यावर ( Husband stabs wife in the neck )भाजी कापण्याच्या चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना भिवंडीतील कारिवली गावातील वरलीपाडा येथील एका घरात घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात ( Bhoiwada police station ) विविध कलमानुसार आरोपी नवऱ्यावर गुन्हा दाखल ( Filed a crime against the husband ) करण्यात आला आहे. इरफान रफिक शेख (वय ३०) असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे. तर कुरेशा (वय २१) असे गंभीर जखमी झालेल्या बायकोचे नाव असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तीन वर्षांपूर्वीच झाला होता निकाह -
आरोपी इरफान भिवंडीतील कारिवली गावातील वरलीपाडा येथील एका चाळीत पत्नी कुरेशा सोबत राहतो. तीन वर्षांपूर्वीच या दोघांचा निकाह झाला होता. त्यातच आरोपी पतीला दारूचे व्यसन जडले होते. तसेच काही दिवसापासून तो किरकोळ कारणावरून सतत बायकोशी वाद घालत होता. त्यानंतर २० डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा एकदा झाला. कोणी तरी तुझ्यावर जादू टोणा केला. त्यामुळे तू मला परेशान करतीस असे बायकोला बोलून शिवीगाळ करीत असतानाच, बायकोने त्याला शिवीगाळ करू नकोस म्हणून सांगितले. मात्र त्याला आणखीच राग आला आणि त्याने बायकोला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली आणि किचनमध्ये पडलेला भाजी कापण्याच्या धारदार चाकूने तिच्या गळ्यावर, हातावर सपासप वार केले. यामध्ये बायको गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थोरोळ्यात पडली. त्यानंतर घाबरलेल्या आरोपी नवऱ्याने घरातून पळ काढला.
आरोपी नवऱ्याचा शोध सुरु -
या वादात जखमी झालेल्या बायकोला तिथेच सोडून घाबरलेल्या आरोपीने पलायन केले. मात्र, त्यानंतर जखमी बायकोला शेजाऱ्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याबरोबर या घटनेतील फरार आरोपी इरफानचा भोईवाडा पोलीस पथक शोध घेत आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. मागाडे करीत आहेत.