नवी मुंबई -जेवण चांगले बनवले नाही म्हणून वाद घालत नवऱ्याने बायकोला मारहाण करत गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना खारघर परिसरातील पाईपलाईन झोपडपट्टीमध्ये घडली आहे. राजू राठोड (28) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. खारघर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
जेवण चांगले बनवले नाही! नवऱ्याने गळा दाबून केला बायकोचा खून पोलिसांना पाहताच नवऱ्याने काढला पळखारघर पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी रात्री साडे 9च्या दरम्यान पाईपलाईन झोपडपट्टी जवळ नवरा बायकोचे भांडण सुरू होते. भांडणादम्यान नवरा बायकोला मारत होता. या घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व बिट मार्शल व ड्युटी ऑफिसर घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत नवऱ्याने बायकोचा गळा दाबून तिला जीवे मारले होते. आरोपी नवऱ्याने पोलिसांना बघताच पळ काढला. अंधाराचा व झोपडपट्टीचा फायदा घेत तो घटनास्थळावरून पळाला. मात्र, त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
जेवणं चांगले बनवले नाही असे क्षुल्लक कारण देत केला खूनपोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने बायकोने जेवण चांगले बनविले नाही या क्षुल्लक कारणावरून वाद घालत पत्नीला मारहाण केली. मारहाणीत तिचा गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाला अशी कबुली दिली. राजू बिगारी काम करत होता. तो मूळचा कर्नाटक येथील रहिवासी असून सद्यस्थितीत पाईपलाईन झोपडपट्टी खारघर येथे राहत होता. राजूची बायको भुजी राजु राठोड (23) तीही बिगारी काम करीत होती. त्यांना एक 5 वर्षाचा मुलगा व 3 वर्षाची मुलगी आहे.