महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रागाच्या भरात पत्नीचा ब्लँकेटने गळा आवळून खून; पती फरार - husband kill wife

घरगुती वादातून झालेल्या भांडणात राग अनावर झालेल्या पतीने ब्लँकेटने गळा आवळून उशीने तोंड दाभत पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तर, मीदेखील आत्महत्या करणार असल्याचे सांगून आरोपी फरार झाला आहे.

रागाच्या भरात पत्नीचा ब्लँकेटने गळा आवळून खून
रागाच्या भरात पत्नीचा ब्लँकेटने गळा आवळून खून

By

Published : Feb 25, 2020, 2:53 AM IST

ठाणे- घरगुती वादातून झालेल्या भांडणात राग अनावर झालेल्या पतीने ब्लँकेटने गळा आवळून उशीने तोंड दाभत पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पत्नीचा खून केल्यांनतर आरोपी पतीने एका नातेवाईकाला फोन करून घडलेल्या प्रकारची माहिती दिली. तर, मीदेखील आत्महत्या करणार असल्याचे सांगून आरोपी फरार झाला आहे.

याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी शोध सुरु केला आहे. अरविंद केशरवानी ( वय 27 ) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर सपना (२७) असे मृतक पत्नीचे नाव आहे. भिवंडी शहरातील पदमानगर - श्रीरंगनगर परिसरात आरोपी अरविंद हा पत्नी व दोन मुलांसह एका इमारतीमध्ये राहत होता. 5 वर्षांपूर्वी त्याचा सपनाशी विवाह झाला होता. काही महिन्यापासून घरगुती वादातून दोघांमध्ये खटके उडत होते.

रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून भांडण झाले. त्यावेळी संतप्त झालेल्या पतीचा राग अनावर झाल्याने त्याने पत्नी सपनाच्या गळ्याभोवती ब्लँकेट आवळून व तोंडावर उशी दाबून तिचा खून केला. त्यांनतर आरोपी अरविंदने घडलेला प्रकार आपल्या एका नातेवाईकाला फोन करुन सांगितला . यासोबतच मीदेखील आता आत्महत्या करणार असल्याचे सांगताच त्या नातेवाईकाने पोलिसांना माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करीत सपनाचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडीच्या इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. दरम्यान, सपनाचे वडिल राजेंद्रकुमार गुप्ता यांनी याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा खुनाचा दाखल केला असून पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details