ठाणे - चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात लोखंडी अँगल मारुन तिची हत्या केल्याची घटना घडली. भिवंडी शहरातील गायत्रीनगर परिसरातून ही घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी पतीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीने पत्नीच्या विविध कारणावरून हत्या केल्याच्या ९ महिन्यात भिवंडीतील ही चौथी घटना आहे. लक्ष्मी रामरतन भारती (35) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर रामरतन सुखलाल भारती (40) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या पतीचे नाव आहे.
चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात अँगल मारून हत्या; 9 महिन्यातील चौथी घटना - भिंवडी पोलीस बातमी
पती-पत्नीमध्ये दररोज भांडण होत होते. त्यातून रविवारी रात्री त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. त्यामधून पत्नीच्या डोक्यात लोखंडी अँगलने जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती अधिकच खलावल्याने तिला पुढील उपचारासाठी ठाण्यातील कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील गायत्रीनगर परिसरातील एका चाळीत आरोपी रामरतन हा मृत पत्नी लक्ष्मी हिच्या सोबत राहत होता. आरोपी पती रामरतन हा लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झाला होता. त्यामुळे आर्थिक अडचणीतून जात असताना तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून या पती-पत्नीमध्ये दररोज भांडण होत होते. त्यातून रविवारी रात्री त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. त्यामधून पत्नीच्या डोक्यात लोखंडी अँगलने जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती अधिकच खलावल्याने तिला पुढील उपचारासाठी ठाण्यातील कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, मृत लक्ष्मी हिची मैत्रीण अफसाना अलताफ शेख (24) हिने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी पती राम रतन सुखलाल भारती याला तात्काळ अटक केली.
- भिवंडीत गेल्या 9 महिन्यात चौथी घटना...
- भिवंडी शहरातील गायत्रीनगर इथं पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी अँगल मारून हत्या
- भिवंडी तालुक्यातील पुर्णा या गावात शुल्लक वादातून पतीने लोखंडी पाईप डोक्यावर ,तोंडावर,पायावर मारून पत्नीची हत्या...
- भिवंडी तालुक्यात पुर्णा इथं आपल्या पोटच्या अकरा महिनीच्या चिमुरडीस पत्नीने स्तनपान करण्यास नकार दिल्याच्या रागातून गुरुद्वारात पुजारी म्हणून काम करणाऱ्या पतीने पत्नीच्या डोक्यात उभ्या पंख्याच्या खालील लोखंडी रॉड घालून केली होती हत्या
- भिवंडी शहरातील श्रीरंग नगर परिसरात राहणाऱ्या पती पत्नी मध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणात राग अनावर झालेल्या पतीने पत्नीच्या गळ्यास ब्लँकेट आवळून व तोंडावर उशी दाबून तिची हत्या केल्याची घटना घडली होती.
दरम्यान या चारही घटना पाहता लॉकडाऊन काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.