ठाणे :रेल्वे प्रवासा दरम्यान एकाच बोगीत बसलेल्या महिलेचे पर्स चोरी झाल्याची घटना घडली होती. यानंतर महिलेच्या सोबत प्रवास करणाऱ्या पतीने दोन प्रवाश्यावर पर्स चोरीचा संशय वक्त करत त्यांचे कल्याण रेल्वे स्थानकातून अपहरण करत त्यांना भिवंडीत नेऊन एका घरात डांबून ठेवत ५० हजाराची खंडणी मागणाऱ्या पतीचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहे. अझर शेख आताहूर रहमान असे अटक पतीचे नाव आहे. तर अपहरण झालेल्या दोघांची त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे. सज्जाद शेख (वय, २१) आणि सजीज शेख (वय १८) असे अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केलेल्या प्रवाश्याची नावे आहेत.
पत्नीची पर्स बोगीतून चोरीस :आरोपी अझर शेख आताहूर रहमान हा मूळचा उत्तरप्रदेशमध्ये राहणार असून तो भिवंडी शहरात पत्नीसह राहतो. तर अपहरण झालेले दोन्ही प्रवाशी मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाणारे आहेत. त्यातच जयनगरहुन मुंबईकडे येणाऱ्या पवन एक्सप्रेसने आरोपी अझर शेख आताहूर रहमान आपल्या पत्नीसह प्रवास करत होते. त्याच बोगीत सज्जाद शेख, सजीज शेख हे देखील प्रवास करत असतानाच, रेल्वे प्रवासादरम्यान आरोपी रहमान यांच्या पत्नीची पर्स बोगीतून चोरीस गेली होती.
दोघांना दोन दिवस डांबून ठेवले :पर्समध्ये दोन हजार तीनशे रुपये असल्याने सहप्रवासी असणाऱ्या सज्जाद आणि सजीज शेख यांच्यावर आरोपी अजर रहमान यांनी पर्स चोरी केले असल्याचा संशय व्यक्त केला. इतकेच नव्हे तर, अझरने कल्याण रेल्वे स्थानकात दोघांना उतरवत या दोघांनाही थेट भिवंडी येथील एका घरात घेऊन गेला तसेच दोघांना एका खोलीत दोन दिवस डांबून ठेवले.
५० हजार रुपयांची खंडणी मागितली :त्यानंतर अपहरणकर्त्या पतीने त्यांच्या सुटकेसाठी दोघांच्या नातेवाईकांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. आपल्या मुलांचे अपहरण होऊन अपहरणकर्ता खंडणी मागत असल्याने नातेवाईकांना धक्काच बसला. त्यामुळे नातेवाईकांना अपहरणची माहिती मिळताच नातेवाईकांनी मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुंबईतील नागपाडा पोलिसांनी दोघांची सुखरूप करून करत हा गुन्हा कल्याण रेल्वे स्थानकात घडल्याने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक करत पुढील तपास सुरू केल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुकेश ढगे यांनी दिली आहे.
हेही वाचा -Nana Patole On Ajit Pawar : सत्यजित तांबे प्रकरण अजित पवारांनी चव्हाट्यावर आणले; नाना पटोले यांचा आरोप