ठाणे: पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा मृतक पत्नी आणि त्यांची २१ वर्षीय मुलगी बदलापूर भागातील वालिवली परिसरातील एका हायप्रोफाईल सोसायटीत राहतात. काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर कल्याण पश्चिम भागातील एका महिलेसोब पतीचे प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर तो त्या महिलेसोबत राहत होता. त्यातच २०१९ साली या आरोपी पती व त्या महिलेमधील अनैतिक संबधाची माहिती आरोपीच्या पत्नीला पत्नीला मिळाली होती. तेव्हापासून पती-पत्नीमध्ये सतत यावरून वाद होऊन भांडण होत होते. मृत पत्नीने वारंवार पतीला त्या बाईचा नाद सोडून द्या, असे सांगितले. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता.
उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू: खळबळजनक बाब म्हणजे एप्रिल २०२३ मध्येही याच वादातून पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. त्यावेळी पतीने पत्नीला सांगितले कि, मी त्या बाईला सोडणार नाही. तुला काय करायचे तू कर , असे बोलून तो घरातून निघून गेला. त्यानंतर काही दिवसांनी त्या बाईनेही मृतक पत्नीला मोबाईलवर मॅसेज पाठला कि, तुझा पती केवळ तुझ्या मुलीला भेटण्यासाठी बदलापूरला घरी येतो. आणि तू त्याला जीव देईल म्हणून ब्लँकमेल करते. असा मॅसेज पाठवल्याने गेल्या एप्रिल महिन्यात पीडित पत्नीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेची माहिती पीडितेच्या मुलीला मिळताच तिने आईला मुंबईला मुलूंड भागातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार दरम्यान १५ एप्रिल २०२३ रोजी पीडित पत्नीचा मृत्यू झाला.