महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळले - भिवंडीत दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळले

आरोपी फिरोज याने गुरुवारी आपल्या पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी पत्नीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या फिरोज याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

husband burned his wife alive for not paying for alcohol in bhivandi
धक्कादायक! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळले

By

Published : Sep 25, 2021, 7:07 PM IST

Updated : Sep 25, 2021, 7:45 PM IST

ठाणे - दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळून तिला ठार मारल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना भिवंडीतील शांतीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपी पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. फिरोज शेख असे पतीचे नाव आहे. तर रुखसाना असे होरपळून मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे.

मृत महिलेच्या भावाची प्रतिक्रिया

उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू -

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये कलमाची वाढ झाल्याचे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या नोंदीवरून दिसून आले आहे. असाच एका कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार भिवंडीतील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या कुटूंबात घडला आहे. आरोपी फिरोज रुखसाना यांचा विवाह १८ वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हापासून तो पत्नीसह राहतो. काही महिन्यापासून त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यातच आरोपी फिरोज याने गुरुवारी आपल्या पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी पत्नीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या फिरोज याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नी रुखसानाने तत्काळ अंगावरील आग विझविण्याचा प्रयत्न करीत तीने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र या घटनेत ती होरपळून गंभीर भाजली. तिला इतर नातेवाईकाच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी रात्रीच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा -धक्कादायक! पत्नीसह दोन वर्षाच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने हत्या करुन पतीची आत्महत्या

Last Updated : Sep 25, 2021, 7:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details