ठाणे -डोंबिवली सांस्कृतिक शहर म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली शहर कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांनी हादरले आहे. डोंबिवली पश्चिम व पूर्वेत राहणाऱ्या पती पत्नीमध्ये विविध कारणावरून भाडण होऊन एका पतीने घरात घुसून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे. तर दुसऱ्या घटनेत पतीने भर रस्त्यातच पत्नीवर धारदार चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केला. या दोन्ही हल्ल्यात गंभीर जखमी पत्नींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. विष्णू नगर पोलिसांनी एका पतीला बेड्या ठोकल्या आहेत. तर रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेतील पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
- हल्लेखोर पतीला अटक
सोमवारी दुपारी दीड-दोनच्या सुमारास आरोपी पती शिवाजी हा सागर आणि त्याची आई राहत असलेल्या घरी आला. आपल्यासोबत राहत नसल्याने आधीच संताप मनात असलेल्या शिवाजी याने घरात घुसून धारदार शस्त्राने पत्नीच्या पोट व पाठीवर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून शिवाजी याने तेथून पळ काढला. तर दुसरीकडे या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या सागरच्या आईला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी सागरच्या जबानीवरून पोलिसांनी भादंवि कलम 307 अन्वये गुन्हा नोंदवून फरार हल्लेखोर पती शिवाजीला अटक केली.
- भररस्त्यात पतीने केलेले पत्नीवर चाकूचे वार
दुसऱ्या घटनेत भररस्त्यात पतीने पत्नीवर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना डोंबिवली पूर्व येथील दत्त नगर परिसरात घडली. हल्लेखोर पतीविरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमनाथ देवकर (४५) असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. त्याची पत्नी वंदना देवकर हिच्या तक्रारीवरुन रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोर पतीचा शोध सुरु केला आहे.
- पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असतानाच भर भरस्त्यात हल्ला