ठाणे -बंद घरांची रेकी करून घरफोडी करणारे सराईत चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. शेखर नटराज नायर (34) रा. कैलास कॉलनी, अंबरनाथ पुर्व, देवेंद्र गणेश शेट्टी (23) रा. मद्रासीपाडा चाळ, उल्हासनगर आणि सुनिता शेखर नायर, (28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
आरोपींना उल्हासनगरातून अटक -
कल्याण पश्चिम परिसरातील रामबागमध्ये सोमनाथ बाळासाहेब सिनारे हे कुटूंबासह रामबागमधील मुकुंद सोसायटी राहतात. १४ जानेवारी रोजी दिवसभर सिनारे कुटूंब घराला कुलूप लावून कामानिमीत्त बाहेर गेले होते. त्यावेळी या आरोपी तीघांनी त्यांच्या घराची रेकी करून दरवाज्याचा कुलूप व कडी तोडले. तसेच 1 लाख 27 हजार 500 रुपयांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सिनारे कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता, दोन संशियत व्यक्ती त्यांना जाताना दिसले. याच आधारावर पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी अंबरनाथमधून शेखर व सुनिता या पती पत्नीला व साथीदाराला उल्हासनगरातून अटक केली.
बंद घरांची करायचे रेकी -