ठाणे -पत्नीशी शेजारच्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने त्या तरुणाशी वाद घातला होता. याच वादातून त्या तरुणाने मित्राच्या मदतीने वाद घालणाऱ्या पतीचे नवी मुंबई परिसरातून अपहरण करून त्याची कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात आणून हत्या केली. त्यांनतर मृतदेह गावदेवी तलावात फेकला. याप्रकरणी मृतकच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी ४८ तासातच हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. साजन मारुती कांबळे ( वय २६ रा. घणसोली, नवी मुंबई) डिव्हाईन घोन्सलवीस (वय २४ रा. वरळी कोळीवाडा मुंबई ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चंद्रकांत शेलार असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.
नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात चंद्रकांत बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने ३१ ऑगस्ट रोजी दिली होती. त्यांनतर कल्याण पूर्वेतील चिंचपाडा गावात सोमवारच्या रात्री तलावात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी पथकासह घटनास्थळाकडे धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या शरीरावर टॅटू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता.
दंडांवरील टॅटूमुळे पटली ओळख