महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wild Lizard Entered In Canteen : कँटीनमध्ये अचानक भलीमोठी घोरपड घुसल्याने ग्राहकांसह मालकाचा उडाला गोंधळ - snake charmer caught the ghorpad

वडापाव, चहा, मिसळ हे खाद्य विक्री करणाऱ्या कँटीनमध्ये भलीमोठी घोरपड घुसल्याने (wild lizard entered in canteen Thane ) न्याहारी करणाऱ्या ग्राहकांसह मालकामध्ये एकच गोंधळ उडाला (Owner confusion with customers) होता. ही घटना कल्याण पश्चिम भागातील लाल चौकी परिसरात असलेल्या कँटिंगमध्ये घडली आहे; मात्र सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घोरपडीला शिताफीने पकडल्याने (snake charmer caught ghorpad) कँटिंग मालकासह कामगाराने सुटकेचा निश्वास घेतला. Latest news from Thane

Wild Lizard Entered In Canteen
घोरपड घुसल्याने ग्राहकांसह मालकाचा गोंधळ

By

Published : Nov 6, 2022, 5:20 PM IST

ठाणे : वडापाव, चहा, मिसळ हे खाद्य विक्री करणाऱ्या कँटीनमध्ये भलीमोठी घोरपड घुसल्याने (wild lizard entered in canteen Thane ) न्याहारी करणाऱ्या ग्राहकांसह मालकामध्ये एकच गोंधळ उडाला (Owner confusion with customers) होता. ही घटना कल्याण पश्चिम भागातील लाल चौकी परिसरात असलेल्या कँटिंगमध्ये घडली आहे; मात्र सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घोरपडीला शिताफीने पकडल्याने (snake charmer caught ghorpad) कँटिंग मालकासह कामगाराने सुटकेचा निश्वास घेतला. Latest news from Thane

घोरपडीला सुरक्षित बाहेर काढताना सर्पमित्र

ग्राहकांसह मालकाने काढला पळ-कल्याण पश्चिम भागातील लाल चौकी परिसरात विलास झुंजारराव यांची वडापाव, चहा विक्रीची कँटिंग आहे. त्यातच आज सकाळच्या सुमारास कँटिंगमधील कामगार काम करत असताना त्याला किचनच्या अडगडीत जागेत खाली काही तरी दडून बसल्याचे दिसले. कामगाराने त्या प्राण्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला असता ती घोरपोड असल्याचे लक्षात येताच त्याने दुकानाबाहेर धूम ठोकली. त्याला पाहून मालकांसह ग्राहकांनीही कँटीग बाहेर पळ काढला.

निर्सगाच्या सानिध्यात सोडून घोरपडीला जीवदान -त्यानंतर कँटीग मालक झुंजाराव यांनी किचनच्या अडगळीत जागेत घोरपड शिरल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी अडगळीत जागेत दडून बसललेल्या घोरपडीला शिताफीने पकडले. ही घोरपड साडेतीन लांबीची असून तिला कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने जगंलातील निर्सगाच्या सानिध्यात सोडून तिला जीवदान दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details