ठाणे- उद्धव ठाकरे यांच्या बापाचेच राज्य हे जितेंद्र आव्हाडच्या बापाचेच राज्य आहे, असे प्रत्युत्तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदार आशिष शेलार यांना दिला आहे.
'हो हे माझ्या बापाचं राज्य, आम्ही बाप शोधायला गुजरातला जात नाही' - आमदार आशिष शेलार
आम्ही आमचा बाप गुजरातेत शोधयला जात नाही, असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांना गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी लगावला आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीका केली होती. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सीएए कायदा लागू न करायला बापाचे राज्य आहे का?, असे शेलार म्हणाले होते. शेलार यांच्या वक्तव्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
मंत्री आव्हाड म्हणाले, आम्ही काळ्या मातीला आई मानतो आणि मराठी माणसाला आमचा बाप मानतो. हे मराठी मनाचे राज्य आहे. अभिमानाने देशभरात आणि जगभरात संगणाऱ्यांची औलाद आम्ही आमचा बाप गुजरातेत शोधयला जात नाही, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांना गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी लगावला आहे.