ठाणे :मृतक काराभाई रामभाई सुवा(६५) हे मूळचे गुजरात राज्यातील असल्याची माहिती सूत्रांची आहे. ते ठाणे स्टेशन रोडवरील प्रिन्स हॉटेलच्या 303 नंबरच्या रूमध्ये राहत असल्याची माहिती हॉटेलचा स्वागतकक्षातील कर्मचारी दिलीपकुमार भरतकुमार पल्लई याने दिली. त्याच्या फिर्यादीवरून ठानेनगर पोलिसांनी वेटर राजन शर्मा याच्या विरोधात गुन्हा नोंदविला. हॉटेलमध्ये काम करणारा आरोपी वेटर राजन शर्मा याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून त्यांचे गळ्यावर, चेह-यावर हत्याराने ठिकठिकाणी टोचुन त्यांना गंभीर जखमी करून जिवे ठार मारले असल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट होत आहे. हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. ठाणे नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शिवसेना शाखा प्रमुखाची हत्या :उल्हासनगर शहरातील शिंदे गटाच्या शिवसेना शाखा प्रमुखाची पूर्वीच्या भांडणासह पाच हजार रुपये उसेन पैसे देण्यास नकार दिल्याने हत्या करण्यात आली आहे. शब्बीर सलीम शेख (वय ४५) असे हत्या झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या शाखा प्रमुखाचे नाव आहे. टोळीने शेख यांच्यावर धारधार चाकू सुऱ्याने २० ते २० सपासप वार करून जुगाराच्या अड्ड्यावर सपासप वार केल्याची धक्कादायक घटना २६ मे रोजी घडली होती. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक पाच या भागात असलेल्या जय जनता कॉलनीमध्ये घडली होती.
पाच जणांना अटक :याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात सहा जणांच्या टोळी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह चार मारेकऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चार आरोपीमध्ये दोन सख्या भावाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. विक्रम उर्फ विकी राजेंद्र कवठणकर ( वय २६, ) दिनेश राजेंद्र कवठणकर ( वय २३ ) , दोघेही रा. विर तानाजी नगर, उल्हासनगर), प्रशांत उर्फ सलाड सुरेश तायडे ( वय, २४ रा. पाटीलनगर, मांडा टिटवाळा ) तकबीर दादाजी बोराळे, (वय २३, रा. राहुल नगर उल्हासनगर), असे २४ तासात अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.
जुगार अड्ड्यावर सपासप वार :मृतक शब्बीर हा उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच या भागात जय जनता कॉलनीमध्ये कुटूंबासह राहत होता. काही दिवसापासून मुख्य हल्लेखोर विक्रम उर्फ विकी या गुंडांशी पूर्ववैमनस्यातून मृत शब्बीरच्या भावाशी भांडण झाले होते. त्यावेळी दोन्ही गटावर हिललाईन पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच भाडणंचा राग तसेच मुख्य आरोपीने ५ हजार रुपये उसने मागितले होते. मात्र, मृतक शब्बीरने देण्यास नकार दिला होता. याच दोन्ही वादातून २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जय जनता कॉलनीमध्ये असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. मुख्य आरोपी विक्रमसह त्याच्या टोळीने धारधार चाकू, सुरे खुले आम हातात घेऊन त्याचा पाठलाग त्याच्यावर जुगार अड्ड्यावर सपासप वार केले. हल्यावेळी जुगार खेळणाऱ्या जमावामध्ये एकच पळापळ झाली होती. दुसरीकडे हल्लेखोर शब्बीरवर हल्ला करताना सीसीटीव्ही कैद झाले होते.
हेही वाचा -Mumbai Crime : गँगविरोधात साक्ष दिल्याने काॅलेज तरुणावर कटरने सपासप वार