महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना अपडेट : कल्याण,डोंबिवलीतील 'हॉटस्पॉट प्रभाग घोषित; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - corona hotspot

कल्याण डोंबिवली शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी ७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी २ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, पालिका प्रशासनाने रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी निरीक्षणावरुन हॉटस्पॉट प्रभाग घोषित केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

कोरोना अपडेट : कल्याण डोंबिवलीत 'हॉटस्पॉट प्रभाग घोषित; नागरिकांना सावधानगी बाळगण्याचे आवाहन
कोरोना अपडेट : कल्याण डोंबिवलीत 'हॉटस्पॉट प्रभाग घोषित; नागरिकांना सावधानगी बाळगण्याचे आवाहन

By

Published : Apr 19, 2020, 2:52 PM IST

Updated : Apr 19, 2020, 3:10 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत आतापर्यत ७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पालिका प्रशासनाने रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी निरीक्षणावरुन हॉटस्पॉट प्रभाग घोषित केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

डॉ. सूर्यवंशी, आयुक्त, कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी ७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी २ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील गांधारी, टिटवाळा गणेश मंदिर, शहाड, फ्लॉवर व्हॅली, चिकणघर गावठाण, गरिबाचा वाडा, गावदेवी मंदिर नवेगाव, ठाकूरवाडी, कोपरगाव, म्हात्रे नगर, सारस्वत कॉलनी, अंबिका नगर, तुकाराम नगर, नेहरु नगर, जाईबाई विद्यामंदिर, विजय नगर, तिसगाव गावठाण, सागाव सोनारपाडा या प्रभागात रुग्ण आढळून आले आहेत.

तर, डोंबिवलीतील म्हात्रेनगर, अहिरेगाव, छेडा रोड, तुकाराम नगर, रेतीबंदर रोड, कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, भगवान नगर, कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा प्रभागात अधिक प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने हे प्रभाग हॉटस्पॉट म्हणून पालिका आयुक्तांनी घोषित केले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १२२ प्रभाग असून २२ प्रभागात ७३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने नागरिकांनी सावधानगी बाळगा, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

Last Updated : Apr 19, 2020, 3:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details