ठाणे - अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचे शेकडो कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी निघालेला इगतपुरी ते मुबंई असा लाॅगमार्च आंदोलनला सुरुवात झाली आहे. शेकडो आंदोलनकर्ते कसारा घाटमार्गे शहापूर तालुक्यात दाखल झाले आहे. कालच (23 जाने.) नाशिकच्या इगतपुरी येथून कसारा घाट, असा पायी प्रवास करत लाँगमार्च शहापूरमध्ये दुपारच्या सुमारास दाखल झाला आहे.
वसतिगृह कर्मचारी संघटनेचा इगतपुरी ते मुबंई पायी मोर्चा शहापुरात दाखल तुटपुंजे मिळणाऱ्या मानधनात वाढ करा
अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे. ती म्हणजे अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना नियमित करून घ्यावे व तुटपुंजे मिळणारे मानधानमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी इगतपुरी ते मुबंई, असा लाँगमार्च काढण्यात आला आहे.
हेही वाचा -मंत्री एकनाथ शिंदेंची नाइट शिफ्ट; मध्यरात्री कोपरी पुलावर गर्डरच्या कामाची केली पाहणी