नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत हात धुणे गरजेचे झाले आहे, मात्र, एका सॅनिटायझरची बाटली अनेकजण हाताळून अडचणी निर्माण होऊ शकतात. नवी मुंबईत याकरिता स्पर्शविरहीत सॅनिटायझर स्टॅण्ड बनविण्यात आला आहे. अंत्यत कमी खर्चात व घरगुती साहित्यात हा स्टॅण्ड बनला आहे. नेरुळमधील शेखर जगताप यांनी हा स्टॅण्ड तयार केला आहे.
कोरोना दक्षता : अवघ्या पाच रुपयांत बनवले 'हॅण्ड सॅनिटाझर स्टॅण्ड' - hand sanitizer news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत हात स्वच्छ करणे गरजेचे झाले आहे. मात्र, बाहेरून आल्यावर सॅनिटायझरच्या बाटलीला स्पर्श केल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नेरुळच्या शेखर जगताप यांनी स्पर्शविरहीत हॅण्ड सॅनिटायझर स्टॅण्ड तयार केला असून याकरिता त्यांना केवळ 5 रुपये खर्च आला आहे.
हा स्टॅण्ड त्यांनी दोरी, लाकूड आणि चिकनपट्टीचा वापर केला आहे. जगताप यांनी हॅण्ड सॅनिटायझरच्या बाटलीला दोरीच्या सहाय्याने बांधले. त्यानंतर, या बाटलीच्या वर आणि खाली सोडलेल्या दोरीला लाकूड बांधून स्टॅण्ड तयार केला. त्यामुळे पायाच्या सहाय्याने लाकडाच्या तुकड्यावर दाब देऊन, हे सॅनिटायझर कुठेही स्पर्श न करता सहज हातावर घेता येत आहे. बाजारात सॅनिटाझर स्टॅण्डची किंमत साधारणत: 400 ते 500 रुपये आहे. मात्र, हा घरगुती स्टॅण्ड अवघ्या 5 रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे.