महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गृहराज्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - mla sarnaik in anvay naik

मराठी वास्तू विशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अखेर नाईक कुटुंबाला न्याय मिळण्याची अशा पल्लवित झाली आहे. या प्रकरणी गृहराज्यमंत्री शंभू राजे देसाई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अन्वय नाईक
अन्वय नाईक

By

Published : Aug 15, 2020, 5:57 PM IST

मीरा भाईंदर(ठाणे)- मराठी वास्तू विशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अखेर नाईक कुटुंबाला न्याय मिळण्याची अशा पल्लवित झाली आहे. याप्रकरणी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी स्पष्टपणे सूसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णव गोस्वामी यांचे नाव लिहले असतानासुद्धा तत्कालीन फडणवीस सरकारकडून गोस्वामींवर कोणतीही कारवाही करण्यात आलेली नव्हती व त्यांना पाठीशी घालायचे काम सुरू होते.

माहिती देताना अन्वय नाईक यांच्या पत्नी अश्विनी नाईक व आमदार प्रताप सरनाईक

नाईक कुटुंबीय वणवण फिरूनही त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यांच्या पत्नी अश्विनी नाईक यांनी समाज माध्यमातून त्यांचे दुःख आणि वेदना व्यक्त केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना पत्र लिहून याप्रकरणी १५ ऑगस्टच्या आत सखोल चौकशीचे आदेश द्या, अन्यथा त्यांच्या पत्नी अश्विनी नाईक यांच्यासोबत मी स्वतः मंत्रालयाबाहेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याकडे 'सत्याग्रह' करणार, असा इशारा दिला होता. अखेर सरकारकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ ला केली होती आत्महत्या, कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत -

मुंबईतील मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी ५ मे २०१८ ला (मौजे कावीर, ता. अलिबाग) येथे त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच दिवशी त्यांच्या पत्नीच्या वतीने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाली होती. या प्रकरणाची 'सूसाईड नोट' पोलिसांना प्राप्त झाली असून या प्रकरणी ठोस कारवाई तत्कालीन सरकारकडून झाली नसल्याने, नाईक कुटुंबियांना न्यायाची प्रतीक्षा होते. या प्रकरणात ६ ऑगस्ट रोजी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे कारवाईची मागणी केली होती. परंतु, महाविकास आघाडी सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे नाईक यांच्या पत्नी आणि आमदार सरनाईक यांनी आज (१५ ऑगस्ट) मंत्रालयाबाहेर आंदोलन करणार, असा इशारा दिला होता.

चौकशी करण्याबाबत निवेदन

मे महिन्यात अन्वय नाईकच्या पत्नीने व मुलीने या प्रकरणाच्या तपासाबाबत गृहमंत्री यांची भेट देखील घेतली होती. २६ मे २०२० रोजी एक ट्विट करून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची सीआयडीने चौकशीचे पुनरादेश दिल्याचे घोषित केले होते. त्यानंतर या प्रकरणाची सीआयडी चौकशी पूर्ण झाली का? झाली असेल तर तपासाची सद्यस्थिती काय आहे? याची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची माहिती प्रसार माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत असते, तशाच प्रकारे गृहमंत्री या नात्याने अन्वय नाईक प्रकरणाची माहिती जनतेला आपण प्रसार माध्यमातून द्याल, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details