महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस यंत्रणावरील खर्चात हात आखडता घेणार नाही - अनिल देशमुख - कोरोनाबाधित पोलिसांसाठी नवी मुंबईत रुग्णालय

कोरोना झालेल्या पोलिसांना आणि त्यांच्या परिवाराला योग्य ते उपचार मिळावेत, यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कोरोना रुग्णालयाची उभारणी केली आहे. नेरुळ आणि कळंबोली येथे उभारलेल्या कोविड रुग्णालयाला आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

Mumbai
अनिल देशमुख

By

Published : Jun 11, 2020, 7:46 PM IST

Updated : Jun 11, 2020, 8:49 PM IST

नवी मुंबई - पोलीस यंत्रणावरील खर्चात कुठेही हात आखडता घेणार नसल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नवी मुंबईत केले. ज्या पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस पोलीस दलात नोकरी देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासह कोरोनाबाधित पोलिसांवर योग्य रितीने उपचार केले जातील, अशी शाश्वती देशमुख यांनी दिली.

पोलीस यंत्रणावरील खर्चात हात आखडता घेणार नाही - अनिल देशमुख

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना योग्य उपचार मिळावेत म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून कोरोना रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या रुग्णालयास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यातील सर्वच भागात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. पोलिसांबरोबर त्यांच्या परिवारातील सदस्यांनाही कोरोनाने घेरले आहे. अनेकांचे यात मृत्यू देखील झाले आहेत. त्यामुळे कोरोना झालेल्या पोलिसांना आणि त्यांच्या परिवाराला योग्य ते उपचार मिळावेत, यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कोरोना रुग्णालयाची उभारणी केली आहे. नेरुळ आणि कळंबोली येथे उभारलेल्या कोविड रुग्णालयाला आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली. यावेळी येथे उभारलेल्या अद्यावत सुविधांचा पाहणी केली. एकूण 125 बेडचे कोविड रुग्णालय फक्त पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यासाठी उभारण्यात आले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस कोरोना रुग्णालय उभारण्याचे आदेश दिल्याचे अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Jun 11, 2020, 8:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details