मीरा भाईंदर (ठाणे) - देशासह राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यातच राज्याचे नगरविकास तथा ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी, म्हणून मीरा रोडमध्ये महामृत्युंजय जप व होम हवन करण्यात आले.
एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी केले होम-हवन - एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण
राज्याचे नगरविकास तथा ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी, म्हणून मीरा रोडमध्ये महामृत्युंजय जप व होम हवन करण्यात आले.
राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना अनेक आमदार, खासदार, तसेच मंत्र्यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याच समोर आले आहे. अनेक मंत्री कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहेत. त्यातच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. याचं पार्श्वभूमीवर मीरा रोड मधील शाखाप्रमुख महेश शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी होम हवन करून प्रार्थना आयोजित केली. यावेळी अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
सध्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असून उद्या पुन्हा संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोविड चाचणीदेखील करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.