महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

होळीमध्ये दहशतवाद्यांचे दहन करून जवानांना श्रद्धांजली

आतंकवाद्यांचे होळीमध्ये दहन करून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

होळीमध्ये आतंकवाद्यांचे दहन करून जवानांना श्रद्धांजली

By

Published : Mar 20, 2019, 9:38 PM IST

ठाणे- पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या आतंकवाद्यांचे होळीमध्ये दहन करून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे आतंकवादी वेगवेगळ्या देशात हल्ले करून निष्पाप लोकांचा बळी घेतात. यामध्ये जीवित व वित्तहानी होते. आतंकवाद्यांच्या या क्रूर वागण्याने विद्यार्थ्यामध्येसुद्धा द्वेषाची भावना निर्माण होते. सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत होळी केली. देशावर हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना कंठस्थान घालण्याचे बळ आमच्या सैनिकांना दे रे महाराजा, पर्यायवरणाची हानी न करण्याची बुद्धी सर्वांना दे रे महाराजा, अशा प्रकारचे गाऱ्हाणेही यावेळी घळण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्यासह गणेश पाटील, ओमप्रकाश धनविजय, माधुरी काळे, उर्मिला साबळे, संतोष कदम, रामदास बोऱ्हाडे, संजय राठोड, विदया कांबळे, गणेश पालांडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details