ठाणे -देशात सध्या हिजाब प्रकरणावर ( Hijab case in the country ) उठलेल्या वादळाने थैमान घातलेले असतानाच मुंब्र्यात मात्र हिंदू मुस्लिम ऐकतेचा अनोखा संगम पहायला मिळत आहे. गेली पाच वर्षे इथे हिंदू आणि मुस्लिम मुली एकत्र येऊन फुटबॉलचा सराव करतात. दोन्ही धर्माच्या मुली एकत्र खेळत असल्या तरी आजच्या परिस्थितीचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नसल्याचे पहायला मिळाले. तसेच त्यांनी मंगळवारी बुरखा घालून फुटबॉल सामना खेळला. त्यांना हिंदू मुलिंनीही साथ दिली. हिंदू मुलींनी दुपट्टा डोक्याला गुंडाळून फुटबॉल खेळला. कर्नाटकातील हिजाब बंदीचा निषेध करण्यासाठी हा सामना आयाोजित करण्यात आला होता. त्याचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.
मुस्लिम मुली परिधान करत असलेल्या हिजाब वरून सध्या देशात गोंधळाची ( Agitations over hijab issue ) परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक राज्यातील उडुपी येथील एका शैक्षणिक संस्थेत हिजाब घालून ( Hijab case at Udupi ) प्रवेश करणाऱ्या एका मुलीला प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण देशातील मुस्लिम समाज चवताळून उठला. देशातील विविध भागात मुस्लिम संघटनांनी एकत्र येत आंदोलन सुरु केले. भाजप विरोधी राजकीय पक्षांच्या हातात आयतेच कोलीत लागल्याने त्यांनी हा संधीचा फायदा घेत आगीत तेल ओतण्याचे काम सुरु केले. देशात ही परिस्थिती असताना हिंदू मुस्लिम संघर्षाच्या नेहमीचं केंद्रस्थानी राहीलेल्या मुंब्र्यात मात्र हिंदू मुस्लिम बंधुत्वाचे अनोखे दर्शन ( Hindu-Muslim brotherhood in Mumbra ) बघायला मिळत आहे.
मुंब्र्याच्या आसपासच्या परिसरातील हिंदू आणि मुस्लिम मुली गेली पाच वर्षे एकत्र येत फुटबॉलचा ( Hindu-Muslim girls football match ) सराव करतात. मुस्लिम मुली या हिजाब वापरतात तर हिंदू मुली दुपट्टे बांधून सराव करतांना दिसतात. दोन्ही समाजाच्या मुली एकमेकांच्या रूढी आणि परंपरांचा सम्मान करत असल्याने त्यांच्यात कधीच कोणता वाद झाला नसल्याचे मत प्रशिक्षक सबा शेख यांनी व्यक्त केले. दोन्ही समाजाच्या मुली सणासुदीला एकमेकींच्या घरी जाऊन आनंदात सामील होतात. त्यामुळे त्यांच्यात प्रेमाचे आणि आपले पणाचे नाते प्रस्थापित झाले असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.