ठाणे -डान्सबारवरील बंदी जानेवारी २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने उठविल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा ऑर्केस्टाबारच्या नावाखाली डान्सबार सुरु झाले. त्यातच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ऑर्केस्टाबारलाही जवळपास ६ महिने टाळे लागले होते. त्यांनतर राज्य सरकराने टाळेबंदीचे नियम शिथिल करताच पुन्हा ऑर्केस्टाबारमध्ये छमछम सुरु झाली. तर पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी बहुतांश बारमालकांनी बारबालांना लपविण्यासाठी छुप्या खोल्या अद्यावत केल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे टाळेबंदीपूर्वी उल्हासनगर येथे महापालिकेने काही डान्सबारच्या छुप्या खोल्यावर होताडा चालवीत बारमधील त्या खोल्या उध्वस्त केल्या. मात्र टाळेबंदीचे नियम शिथिल होताच पुन्हा उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी महापालिका हद्दीत आजही पोलिसांची छापेमारी होताच या छुप्या खोल्याचा आसरा बारबाला घेताना दिसत आहे.
डान्सबार बंदीच्या काळात ठाणे पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील महापालिकांना डान्स बारमधील बारबालांना लपविण्यासाठी तयार केलेल्या छुप्या खोल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जुलै २०१४ देण्यात आले होते. त्यावेळी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिकेच्या वतीने बारमधील छुप्या खोल्यांचा शोध घेवून त्यावर कारवाईसाठी समिती गठीत करण्यात आली होती. मात्र ७ वर्षाच्या कालावधीत बहुसंख्याने असलेल्या ऑर्केस्ट्रा व लेडीज सर्व्हिस बारपैकी केवळ १० ते १२ डान्स बारच्या छुप्या खोल्यावर महापालिकांनी दिखावाची कारवाई केली होती. त्यातच टाळेबंदी उठवल्याने मध्यरात्री उशिरा चालणाऱ्या डान्स बारमध्ये पुन्हा बारबालांना लपविणाऱ्या छुप्या खोल्या गजबल्या असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यापासून निर्माण झाले आहे. त्यातच उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात डान्स बारसह लेडीज बारचे पेव फुटले आहे. या बारवर पोलिसांच्या कारवाई दरम्यान बारबालांना लपविण्यासाठी तळ घरात बेकायदा बांधकाम करून मोठ्या संख्येने छुप्या खोल्या बांधण्यात आल्या होत्या. टाळेबंदीपूर्वी त्या खोल्यावर केवळ उल्हासनगर महापालिका अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात हातोडा मारून उध्वस्त केल्या होत्या.
तत्कालीन पोलीस आयुक्तांनी कारवाईचे दिले होते निर्देश
बहुतांश शहरात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्रास डान्सबार सुरू असून अश्लील प्रकार सुरू असल्याचे अनेकदा पोलिसांच्या छापेमारी वेळी समोर आले आहे. शिवाय हे डान्सबार गुन्हेगारीचे केंद्र बनत आहेत. या ठिकाणी बारमध्ये नृत्य करणाऱ्या महिलांवर पैशांची उधळण करणे, अश्लील प्रकार सुरू असततात. या बाबत पोलिसांनी अनेकदा कारवाई केली आहे. मात्र या गायिकांशिवाय बारबाला त्यांच्या हाती लागत नव्हत्या, त्या कुठे गायब होतात असा असा प्रश्न पोलिसांना पडायचा. अखेर त्या तळ घरातील छुप्या खोल्यांमध्ये जाऊन लापायच्या. विशेष म्हणजे या खोल्या बांधल्या गेल्याचे तत्कालीन पोलीस आयुक्तांना पुन्हा समजताच त्यांनी सर्वात आदी उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला याची माहिती देत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २०१९ मध्ये पोलीस बंदोबस्तात उल्हासनगर श्रीराम चौकात असलेल्या अँप्पल बार, नाईनटी डिग्री बार, राखी बार, अचल बार, चांदणी बार, हँड्रेट डे बार अशा वादग्रस्त ठरलेल्या बहुतांश डान्सबारमधील छुप्या खोल्या उध्वस्त करण्यात आल्या होत्या.
अनधिकृत छुप्या खोल्यांचे जाळे अधिकच पसरले